Tilak Verma Vidhan Maharashtra Bhavan For Vikram Kakade Oath Video: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानसभेच्या निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2026) बिनविरोध झालेले 6 आमदार आज शपथ घेणार आहेत. उर्वरित 11 आमदार उद्या (24 जून) शपथ घेतील. विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडणार आहे. अनिकेत तटकरे, प्राजक्त तनपुरे, रविंद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी आज शपथ घेणार आहेत. दरम्यान, विक्रम काकडे (Vikram Kakade) यांच्या शपथविधीसाठी खास टीम इंडियाचा टी-20 संघाचा उपकर्णधार तिलक वर्मा (Tilak Verma) देखील विधान भवनात दाखल झाला आहे.
तिलक वर्मा एबीपी माझाशी संवाद साधताना म्हणाला की, विक्रम काकडे माझा भाऊ आहे. त्याच्या शपथविधीसाठी विशेष मी उपस्थित राहत आहे. माझी नवी इनिंग सुरू होत आहे. माझ्या मित्राची देखील नवी इनिंग सुरू होत आहे. लोकांसाठी आधी खूप काम विक्रम काकडेंनी केलं आहे, असं तिलक वर्मा म्हणाला. आता देखील ते जास्त काम करतील. विक्रम काकडे त्यांच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करत आहेत. मी माझा क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करत आहे, असं तिलक वर्माने सांगितले. (Tilak Verma Vidhan Maharashtra Bhavan Video)
पुणे विधान परिषदेतून विक्रम काकडे बिनविरोध विजयी- (Vikram Kakade Vidhan Parishad)
पुणे विधान परिषदेतून महायुतीकडून राष्ट्रवादीचे काँग्रेसचे विक्रम काकडे (Vikram Kakade) यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत विक्रम काकडे यांचा बिनविरोध विजय झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांचे निकटवर्तीय म्हणून विक्रम काकडेंची ओळख आहे.
कोण आहेत विक्रम काकडे? (Who Is Vikram Kakade)
1) खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव.
2) अजित पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ता.
3) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू.
4) उत्तम बांधकाम व्यावसायिक.
5) 4 वर्ष स्टेट शुटींग चॅम्पियन, राष्ट्रीय पातळीवरील संघात देखील सहभाग.
6) आंतरराष्ट्रीय पातळीवर इटली, फ्रान्स जर्मनी, थायलंड येथील थाय ओपन स्पर्धेतदेखील सहभाग.
संबंधित बातमी:
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला