Virat Kohli : विराट कोहलीचं ठरलं, 9 जूनपासून काय करणार? मोठी अपडेट समोर – Marathi News | Ind vs afg team india virat kohli is set for training by 9 june for upcoming odi series against afghanistan


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायटन्सला पराभूत करुन सलग आणि एकूण दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. आता त्यानंतर विराट कोहली आणि टीम इंडियाने खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी उत्सूक आहेत. भारतीय संघ मुल्लानपूरमध्ये 6 जूनपासून अफगाणिस्तान विरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंना या मालिकेआधी सरावासाठी बोलावण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांन 9 जून रोजी न्यू चंडीगडमध्ये बोलवण्यात आलं आहे. टीम इंडिया 9 ते 11 जून दरम्यान सराव करणार आहे. त्यानंतर टीीम इंडिया धर्मशालेच्या दिशेने रवाना होणार आहे.

टीम इंडियाचं मिशन वनडे सीरिज

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 6 ते 10 जून दरम्यान कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या दरम्यान वनडे टीम इंडिया 9 जूनपासून सरावाला सुरुवात करणार आहे. जोरदार सराव व्हावा यासाठी सपोर्ट स्टाफने योजना आखली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टेस्ट आणि वनडे या दोन्ही टीममधील खेळाडूंसाठी फॉर्मेटनुसार प्लान करण्यात आला आहे.

जून महिना उजाडल्यानंतरही सूर्यनारायणाचा प्रकोप कायम आहे. न्यू चंडीगडमधील तापमान सपोर्ट स्फाटसाठी सर्वात मोठं आव्हान आहे. न्यू चंडीगडमधील तापमान हे 40 डिग्री पेक्षा अधिक आहे. अशा स्थितीत बॉलिंग करणं गोलंदाजांसाठी फार अवघड आहे. त्यामुळे टीम इंडियात 5 जणांचा नेट बॉलर म्हणून समावेश करण्यात आला आहे. या 5 नेट गोलंदाजांमध्ये मयंक यादव, शिवांग कुमार, सारांश जैन, जिशान अन्सारी आणि आकीब नबी यांचा समावेश आहे.

रोहित-विराटकडे चाहत्यांचं लक्ष

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांची अफगाणिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा पूर्णपणे फिट नाहीय. त्यामुळे रोहित सध्या बंगळुरुतील एनसीएमध्ये आहे. तर दुसऱ्या बाजूला विराट कोहली वनडे क्रिकेटसाठी सज्ज आहे.

विराटने नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात आरसीबीसाठी 16 डावांत एकूण 675 धावा केल्या. त्यामुळे आता विराट वनडे सीरिजमध्ये कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भारत-अफगाणिस्तान एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 13 जून, धर्मशाला

दुसरा सामना, 17 जून, लखनौ

तिसरा सामना, 20 जून, चेन्नई

अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : शुबमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, नितीश कुमार रेड्डी, केएल राहुल, ईशान किशन, वॉशिंगटन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, प्रिंस यादव, गुरनूर ब्रार,कुलदीप यादव, अर्शदीप सिंह आणि हर्ष दुबे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *