Last Updated:
विराट कोहली एका वेगळ्या कारणामुळे देखील चर्चेत आहे.हे कारण सांगायचं झालं तर त्याने नुकतेच लाँच केलेले त्याचे One8 शुज. या शुजची सोशल मीडियावर प्रचंड हवा आहे. मागच्या 24 तासात दीड लाख शूजची विक्री झाली आहे.
Virat Kohli One8 Shoes Sale : टीम इंडियाचा अनुभवी स्टार क्रिकेटपटू विराट कोहली सध्या फिटनेस टेस्ट पास केल्यानंतर मैदानात सराव करतो आहे. कारण त्याला इंग्लंड विरुद्ध वनडे मालिकेत खेळायचे आहे. यासोबत विराट कोहली एका वेगळ्या कारणामुळे देखील चर्चेत आहे.हे कारण सांगायचं झालं तर त्याने नुकतेच लाँच केलेले त्याचे One8 शुज. या शुजची सोशल मीडियावर प्रचंड हवा आहे. मागच्या 24 तासात दीड लाख शूजची विक्री झाली आहे.त्यामुळे 24 तासात त्याने किती पैसे कमावले आहेत? हे जाणून घेऊयात.
विराट कोहलीने क्रिकेटसोबत आता बिझनेसमध्येही नवीन इनिंग सूरू केली आहे. विराट कोहलीने नुकतेच त्याचे One8 ब्रँडचे शुज लाँच केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार,24 तासांत दीड लाख शूज विकले गेले आहेत. प्रत्येक शूची किंमत 9,230 आहे. अशाप्रकारे एकुण विक्री झालेली शुज 1,50,000 X 9,230 =138,45,00,000 (अंदाजे ₹ 140 कोटी) आहे. विराटच्या कसोटी क्रिकेटमधील धावांनुसार किंमत असलेले हे शूज याचे एक उत्तम उदाहरण आहे.
या शूजसाठीची तयारी ही त्याच्या खेळाच्या तयारी इतकीच महत्त्वाची आहे.खेळाडू जेवढा मोठा,तेवढे ब्रँड मोठे. शिवाय, त्याची तंदुरुस्तीही महत्त्वाची असते.अशा तंदुरुस्त खेळाडूला आपला ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्यासाठी कंपन्या कोट्यवधी रुपये खर्च करण्यास तयार असतात. प्रसिद्ध स्पोर्ट्स शू उत्पादक ‘पुमा’ ही त्यापैकीच एक आहे. विराटने आठ वर्षे ‘पुमा’चे शूज वापरले.2017मध्ये विराट कोहलीने जर्मन स्पोर्ट्स शूज ब्रँड ‘पुमा’सोबत हातमिळवणी केली आणि तो भारतातील कंपनीचा सर्वात मोठा चेहरा बनला.अहवालानुसार, या करारासाठी त्याला अंदाजे 110 कोटी रुपये (अंदाजे 1.1 अब्ज डॉलर्स) देण्यात आले. या मोठ्या रकमेव्यतिरिक्त, या करारात आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब होती.
विराट केवळ कंपनीचा चेहराच बनला नाही, तर त्याने भागीदारीत स्वतःची उत्पादनेही बाजारात आणली.’पुमा वन8 (Puma One8) या नावाने खेळाडूंसाठी शूजपासून कपड्यांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असलेली उत्पादनांची संपूर्ण श्रेणी बाजारात आणली गेली. ही भागीदारी यशस्वी ठरली. पुमाने 250 कोटी रुपयांचा (अंदाजे 2.5 अब्ज डॉलर्स) व्यवसाय केला, म्हणजेच कंपनी यशाच्या मार्गावर होती. मग आले २०२५: एका नवीन कराराची वेळ.
मीडिया रिपोर्टनुसार, पुमाने विराटला 300 कोटी रुपयांची (अंदाजे ३ अब्ज डॉलर्स) ऑफर दिली होती. विराटच्या या निर्णयामागे प्यूमा इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक अभिषेक गांगुली होते. अभिषेकने २०२३ मध्ये ‘अजिलिटास’ नावाचा एक स्पोर्ट्सवेअर आणि लाइफस्टाइल स्टार्टअप सुरू केला. त्याला कन्व्हर्जंट फायनान्स आणि नेक्सस व्हेंचर पार्टनर्सकडून 600 कोटी रुपयांचा निधीही मिळाला. ‘मोचिको शूज’ या फुटवेअर ब्रँडचे अधिग्रहण करून अजिलिटासने आपली ताकद दाखवून दिली. आता विराट या ब्रँडचा चेहरा बनला. विराटचा ब्रँड ‘वन8’आणि त्याची उत्पादनेही याचा भाग बनली. याचा परिणाम म्हणजे 24 तासांत 140 कोटी रुपयांची कमाई झाली.
Mumbai,Maharashtra
Jun 24, 2026 10:15 PM IST
