Vidyanand Bapat : विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? रत्नागिरीतून आई वडिलांचा विद्यानंद बापट यांना भावनिक फोन


Vidyanand Bapat रत्नागिरी : पुण्यातील गणेशोत्सवावेळी डीजेच्या वापर करण्यास विद्यानंद बापट यांनी विरोध केला. त्याच मुद्द्यामुळे संतोष चव्हाण या व्यक्तींन विद्यानंद बापट यांना मारहाण झाली. या प्रकरणानंतर रत्नागिरीतील गोळप गावात राहणाऱ्या सुहास बापट आणि कल्पना बापट यांनी मुलगा विद्यानंद बापट यांच्याशी संवाद साधला आहे. 

आई वडिलांचा विद्यानंद बापट यांना फोन

सुहास बापट यांनी विद्यानंद बापट यांच्यासोबत फोनवर संवाद साधला. सुहास बापट यांनी  विद्यानंद बापट यांना बरा आहेस ना तू, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना असं विचारलं. यावर विद्यानंद यांनी ते ठीक असल्याचं आई वडिलांना कळवलं. यानंतर सुहास बापट यांनी विद्यानंद यांना सांभाळून राहा असं सांगितलं. सुहास बापट आणि कल्पना बापट यांनी विद्यानंद यांच्यासोबत संवाद साधला तेव्हा विश्रामबाग पोलीस स्टेशनला असल्याचं त्यांनी सांगितलं. 

कल्पना बापट यांनी विद्यानंद बापट यांच्याबरोबर बोलताना म्हटलं की,आता बाबांना तू जे सांगितलस ते ऐकलं. मी हो तर ते हल्ला झाल्याचं ऐकल्यावर थोडसं एक आई म्हणून मला खूपच वाईट वाटलं. तुझा मुद्दा तर बरोबरच आहे. तू आता आमच्याशी संपर्क केलास केला ते चांगलं केलं.आता फोन उचललास हे चांगलं वाटलं, असं कल्पना बापट यांनी म्हटलं. 

विद्यानंद बापट यांच्या भूमिकेचं आई वडिलांकडून समर्थन

विद्यानंद बापट यांची त्यांच्या आई-वडिलांनी पाठराखण केली आहे. विद्यानंद यांचं म्हणणं योग्य आहे. त्यांना पोलीस संरक्षण मिळायला हवं, अशी मागणी विद्याधर यांच्या आई-वडिलांनी केलीये. विद्यानंद यांच्या आई-वडिलांनी फोनवरून संपर्क साधत काळजी घे असं देखील विद्यानंद यांना सांगितलं. 

सुहास बापट काय म्हणाले?

सुहास बापट यांनी आज जो हल्ला झाला त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो, असं म्हटलंय. म्हणजे आज हा व्यवहार्य हल्ला नाही. ज्या काही गोष्टींबाबत मतभेद असतील तर ते चर्चा करून विचार विनिमय करून सोडवता येतात. त्यामुळे या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेधच करतो. पण विद्यानंदनी जी भूमिका घेतली त्याच मात्र आम्ही समर्थन करतो की डीजे मुक्त हे गणेशोत्सव साजरा व्हावा. आम्ही विद्यानंदचं समर्थन करतो कारण आजारी लोक असतात, वयोवृद्ध लोक असतात  सगळ्यांनाच त्रास होतो, असं सुहास बापट यांनी म्हटलं. 

कल्पना बापट काय म्हणाल्या? 

तो हल्ला तर व्हायची गरज नव्हती. खरं म्हणजे कारण विद्यानंद बोलतोय  तर समोरच्यांनी पण बोललं पाहिजे.एकदम असं हल्ला करणं बरोबर नाहीये तर आणि त्यामुळे मग काय होईल सांगता येत नाही, असं कल्पना बापट यांनी म्हटलं. आज विद्यानंद बचावला असून महापालिकेत देखील तो बचावला होता, असंही कल्पना बापट म्हणाल्या. 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *