Smriti Mandhana: स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम


Smriti Mandhana: भारतीय सलामीवीर स्मृती मंधाना महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे. मंधानाने महिला आशिया कपमध्ये हाँगकाँगविरुद्ध 124 धावा केल्या. 30 वर्षीय मंधानाने भारताची माजी कर्णधार मिताली राजचा 10,868 धावांचा विक्रम मोडला. मंधानाने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,880 धावा केल्या आहेत. मंधाना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 18 शतके करणारी फलंदाजही ठरली आहे. तिने ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगचा 17 शतकांचा विक्रम मोडला.

भारताने हाँगकाँगसमोर 194 धावांचे लक्ष्य ठेवले

दुबईमध्ये खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने हाँगकाँगसमोर 194 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रथम फलंदाजी करताना संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 193 धावा केल्या. शफाली वर्माने 28 धावांचे योगदान दिले. स्मृती मंधानाने 64 चेंडूंमध्ये 14 चौकार आणि 7  षटकारांसह 124 धावा केल्या. महिला टी20 आशिया कपमधील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. यासोबतच तिने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 18 वे शतक पूर्ण केले. इतकेच नाही, तर 10,869 धावांवर पोहोचून तिने मिताली राजचा विक्रम मोडला. यापूर्वी, 10,868 धावांसह मिताली राज महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती.

महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके 

18 – स्मृती मंधाना
17 – मेग लॅनिंग
17- लॉरा वॉल्व्हार्ड
15 – हेली मॅथ्यूज
14 – सुझी बेट्स
14 – टॅमी ब्यूमोंट

महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा 

10869* – स्मृती मंधाना
10868 – मिताली राज
10740 – सुझी बेट्स
10273 – शार्लट एडवर्ड्स
10007- स्टेफनी टेलर

भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारली

या सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 5 गडी गमावून 193 धावा केल्या. मंधाना सर्वाधिक धावा करणारी फलंदाज होती. तिच्या व्यतिरिक्त इतर सर्व फलंदाज अपयशी ठरल्या. संघासाठी दुसरी सर्वाधिक धावा करणारी फलंदाज शेफाली वर्माने 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 17 चेंडूंमध्ये 28 धावा केल्या. इतर कोणताही फलंदाज 15 धावांपर्यंतही पोहोचू शकला नाही. हाँगकाँगसाठी मरीना लॅम्पलॉफने सर्वाधिक दोन बळी घेतले.

इतर महत्वाच्या बातम्या





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *