Video: ओमराजे निंबाळकर म्हणाले, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया


मुंबई : धाराशिवचे खासदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील निष्ठावंत नेते म्हणून ओळख असलेल्या ओमराजे निंबाळकरांनी (Omraje nimbalkar)अखेर आपला निर्णय जाहीर केला. ओमराजेंनी धाराशिवमध्ये आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली, तसेच कार्यकर्त्यांच्या भावनाही ऐकून घेतल्या. त्यानंतर, आपण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेना पक्षात काम करणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे, ठाकरेंच्या फुटीर खासदारांच्या गटात ओमराजे निंबाळकर हेही असल्याचं स्पष्ट झालं. विशेष म्हणजे, ओमराजेंवर सोशल मीडियातून टीका झाल्यानंतर त्यांनी मी अद्याप राजकीय निर्णय घेतलेला नाही, असे म्हटले होते. त्यामुळे, ते ठाकरेंसोबतच राहतील अशी अपेक्षा देखील अनेकांना होती. मात्र, त्यांनी शिंदेंसोबत जात असल्याचं जाहीर केलं. त्यावर, आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) प्रतिक्रिया दिली आहे.  

एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात मी काम करणार, शिवसेना पक्षात प्रवेश करतोय, अशी घोषणा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिवमधील गोवर्धन वाडीतून केली. वडिल पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याप्रकरणाच्या निकालावर भाष्य केल्यानंतर राजकीय दवाबामुळे, सत्तेमुळे सर्वसामान्यांची कामे होत नाहीत, मतदारसंघातील लोकांची कामे होत नसल्याचे ओमराजेंनी म्हटलं. आता, ओमराजेंच्या शिंदे सेनेतील प्रवेशानंतर आदित्य ठाकरेंनी एका वाक्यात आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

ठाकरेंचे सहा खासदार शिवसेनेत गेल्याबद्दल आदित्य यांना विचारण्यात आले होते. त्यावेळी, शिवसेना एकच, ती आमची, बाकी भाजपचे गुलाम आहेत, अशा शब्दात त्यांनी भूमिका मांडली. सरकारने लाडकी बहीण योजनेतून 85 लाख लाडक्या बहिणींना बाहेर काढलं आहे. सरकारकडे बेस्टला द्यायला पैस नाहीत, खासदार विकत घ्यायला मात्र पैसे आहेत, असे म्हणत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तसेच, नालायक लोक गेले, त्यांना जनता दाखवून देईल, यांना निवडणून देणाऱ्या जनतेने भाजप विरोधात मतदान केलं होतं, असेही आदित्य यांनी म्हटले.  

ओमराजे निंबाळकर यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशाबद्दल बोलताना आदित्य म्हणाले की, आम्ही त्यांना येवढं दिलं, पण तरी ते असं वागत असतील तर त्यांनाच कळायला हवं. आदित्य ठाकरेंनी एका वाक्यात ओमराजेंबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. तर, नाशिकमध्ये अपक्षा उमेदवार गोकुळ गीते विजयी झाल्याबद्दल, अरे ये तो सिर्फ ट्रेलर (acting करत) असे म्हणत एकनाथ शिंदेंना डिवचलं. 

गेलेल्यांनी सौदा केलाय, निधीसाठी ते गेले नाहीत

सरकार मतभेद करतं, विरोधी पक्षाला निधी दिला जात होता, पण आता देत नाहीत, हे देशातील नागरिकांशी हा दूजाभाव आहे. निधीसाठी कोणी जात नाही, स्वतःसाठी गेले, गेलेल्यानी सौदा केलाय, असे म्हणत संतापही व्यक्त केला.

हेही वाचा

‘शिवसेनेचा उमेदवारच चुकीचा होता, कोणाचा बाप काढणं ही दराडेंची संस्कृती’; भावाचा विजय होताच गणेश गीते भरभरून बोलले; म्हणाले…

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *