Vat Pournima Special: समर अन् स्वानंदीच्या आयुष्यात प्रेमाचा बहर येणार? ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत मोठा ट्विस्ट, PROMO व्हायरल


Veen Doghantli hi tutena Vat Pournima: पावसाळ्याला सुरुवात झाली की, सणांनाही सुरुवात होते. वटपौर्णिमा (Vat Pournima) या सणाला काही दिवस शिल्लक आहेत.  वटपौर्णिमा या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पुजा करतात. उपवास धरतात. वडाच्या झाडाचीही पुजा करतात.  महाराष्ट्रात या सणाला विशेष महत्त्व आहे. मालिकांमध्येही वट पौर्णिमा विशेष भाग दाखवण्यात येणार आहे.  सध्या झी मराठीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ (Veen Doghantli hi tutena) या मालिकेची प्रचंड चर्चा आहे.  या मालिकेत वटपौर्णिमा विशेष भाग दाखवण्यात येणार आहे.  या मालिकेत समर आणि स्वानंदी वटपौर्णिमा साजरी करणार आहेत. याचा विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

समर स्वानंदीमधील नातं आता अधिक फुलणार आहे. वटपौर्णिमानिमित्त  खास प्रोमोही शेअर करण्यात आला आहे.  ‘सात जन्म भर’ या गाण्यावर दोघांनीही एकत्र डान्स केला आहे. दोघेही एकत्र वडाची पुजा करतात.  समर आणि स्वानंदीच्या नात्यातील लवकरच नवीन टप्पा सुरू होणार आहे. समर हा स्वानंदीला माळरानावर फिरायला  घेऊन जातो आणि स्वानंदी खूश होते.  नंतर तो  स्वानंदीला सरप्राइज देतो. 

‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेतील प्रोमो सोशल मीडियात व्हायरल (Veen Doghantli Hi Tutena Vat Purnima Episode)

माळरानावर घेऊन गेल्यानंतर समर स्वानंदीला प्लांट नर्सरीमध्ये घेऊन जातो. नर्सरीमध्ये लहान रोपे असतात. लहान रोपांचा वापर करुन ‘I love you’, असं लिहिण्यात आले असते. अशा हटक्या पद्धतीने समर स्वानंदीसमोर  आपल्या मनातील भावना व्यक्त करतो.  दरम्यान, समरच्या हटक्या प्रोपोजलवर स्वानंदी काय उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  स्वानंदीचं उत्तर न मिळालेल्यामुळे समर स्वानंदीला, ‘जर आपल्यात तसं काही नसेल, तर तुम्ही वटपौर्णिमेची पूजा करु नका’, असं म्हणतो.

‘वीण दोघांतली तुटेना’ या मालिकेचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत समर इतर महिलांसोबत वडाच्या झाडाच्या फेऱ्या घेताना दिसत आहे.  हे पाहून स्वानंदीला प्रचंड आनंद होतो. या बद्दल तेजश्री म्हणते, ‘मालिका आता महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. समर आणि स्वानंदी एकमेकांसमोर कधी भावना व्यक्त करणार? दोघेही एकमेकांच्या प्रेमात कधी पडणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात होते.  समर आणि स्वानंदीबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती तर, ती अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर होती. लेखकांनी लिहिलेले प्रसंग आम्ही सुंदररित्या सादर करण्याचा प्रयत्न केला आहे’, असं तेजश्री प्रधान म्हणाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘साईबाबांच्या पोथीत पंतप्रधान मोदीजींचा फोटो, रोज पूजा अन् लाडू…’; सुनील शेट्टींचा 15 महिन्यांच्या नातीबद्दल भावनिक खुलासा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *