IND vs IRE 2nd T20 Team India Playing 11 Update : भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना 26 जून रोजी खेळवला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाला 34 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. आता सर्वांचे लक्ष या मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्याकडे लागले आहे. सामना केव्हा, कुठे आणि कोणत्या वेळी होणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. भारतीय संघाच्या प्लेइंग-11 मध्ये खेळाडूंमध्ये काही बदल होणार का, हे जाणून घेण्याची उत्सुकताही त्यांना आहे. तर, आज आम्ही तुमच्यासाठी या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.
भारत विरुद्ध आयर्लंड: दुसरा टी-20 सामना कधी आणि कुठे?
भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 28 जून (रविवार) रोजी खेळला जाईल. हा सामना बेलफास्टमधील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब येथे खेळला जाईल, जिथे भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला होता. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 6:00 वाजता सुरू होईल. नाणेफेक भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 5:30 वाजता होईल. आयर्लंडमधील स्थानिक वेळेनुसार सामना दुपारी 1:30 वाजता सुरू होईल.
दुसऱ्या टी-20 सामन्यातून 3 खेळाडूंचा डच्चू मिळणार
पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. खराब कामगिरीमुळे या 3 खेळाडूंना संघाबाहेर केले जाऊ शकते. पहिल्या टी-20 सामन्यात प्रसिद्ध कृष्णाने अत्यंत महागडी गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांत तब्बल 57 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. तसेच सुंदरला पहिल्या सामन्यात विशेष चमक दाखवता आली नाही. गोलंदाजीत त्याने 1 षटकात 19 धावा दिल्या, तर फलंदाजीत तो फक्त 9 धावा करून बाद झाला. पहिल्या सामन्यात संजू सॅमसनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तो फक्त 4 चेंडूंत 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
‘या’ 3 युवा खेळाडूंना मिळू शकते संधी
संघातून बाहेर पडणाऱ्या खेळाडूंच्या जागी फॉर्मात असलेल्या तीन युवा खेळाडूंना प्लेइंग-11 मध्ये संधी दिली जाऊ शकते. संजू सॅमसनच्या जागी वैभव सूर्यवंशीला संधी मिळू शकते, तो सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. आयपीएल आणि त्यानंतर श्रीलंकेत झालेल्या तिंरगा मालिकेमध्ये त्याने शानदार कामगिरी केली आहे. जर त्याला पदार्पणाची संधी मिळाली, तर तो आयर्लंडसाठी मोठा धोका ठरू शकतो. तसेच आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने प्रभावित करणाऱ्या प्रिन्स यादवला प्रसिद्ध कृष्णाच्या जागी वेगवान गोलंदाज म्हणून संघात स्थान दिले जाऊ शकते. सुंदरच्या जागी फिरकीची धुरा सांभाळण्यासाठी लेग-स्पिनर रवी बिश्नोईचा प्लेइंग-11 मध्ये समावेश केला जाऊ शकतो.
दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग-11 (India Vs Ireland 2nd T20 Playing 11 Update) : अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला