Deeplai Sayyed:भोंदू खरातवरील चित्रपटात एकनाथ शिंदेंसह सुषमा अंधारेंसह ‘या’ नेत्यांच्या भूमिका, दीपाली सय्यद यांचा मोठा गौप्यस्फोट


Deepali Sayeed: गेल्या काही दिवसांपासून ‘ महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ (Maharashtra Epstine Files) या चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरू आहे. नाशिकच्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) काळया कारनाम्यावर आधारित चित्रपटाचा टिझर रिलीज झालाय. या टीझरमधील रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या भूमिकेतील अभिनेत्री दिपाली सय्यद (Deepali Sayyed) यांचा लुक समोर येताच चर्चा रंगली आहे. हा चित्रपट येत्या दोन ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाविषयी अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. या चित्रपटात रूपाली चाकणकर यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांच्या भूमिका आहेत.  

काय म्हणाल्या दीपाली सय्यद?

या चित्रपटात अनेक राजकीय नेत्यांच्या भूमिका असणार आहेत.जशी जशी या चित्रपटाबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती तुमच्यापर्यंत येईल. आत्ताच मी सगळ्या भूमिकांविषयी सांगितलं तर मजा राहणार नाही.प्रत्येक नेत्यांचे रोल या चित्रपटात आहेत.बहुतांश नेत्यांचा सहभाग या प्रकरणात असल्यामुळे प्रत्येकाचा रोल असेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही चित्रपटात रोल असल्याचं दिपाली सय्यद यांनी सांगितलं.या चित्रपटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवार, ठाकरे सेनेच्या सुषमा अंधारे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेक राजकारण्यांच्या भूमिका असणार आहेत असा गौप्यस्फोट शिंदे सेनेच्या नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांची भूमिका करू नये यासाठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांना अनेक धमकीचे कॉल आलेले याविषयी बोलताना त्या म्हणाल्या. ‘आता हे कॉल येत नसले तरी शूटिंग करताना धाकधूक असते. त्यामुळे शूटिंगच्या ठिकाणी गार्ड्स ठेवण्यात आले आहेत.अजूनही मनात भीती आहे.त्यानंतर मला कोणाचा फोन आलेला नाही. ज्या वेळेला मला फोन आला, त्यावेळी माध्यमांमध्येच सगळं काही आलं.त्यानंतर शूट सुरू झाला.मला असं वाटलं की अजून एखादा फोन आला तर आपण तक्रार करूया. नंतर काही फोन आला नाही, त्यामुळे मी थांबले.पण हे मनात तर राहिलंच की एक साधी तक्रार तर करता आली असती.

कोणाकोणाच्या भूमिका असणार?

“या चित्रपटात कशा पद्धतीने एखादी स्त्री श्रद्धा आणि अंधश्रद्धांच्या जाळ्यात ओढली जाते. आयुष्यात कुठल्यातरी दुःख असतं कोणीतरी सांगत हा बाबा आहे. या त्रासातून बाहेर काढण्यासाठी हे बाबा जे सांगतात ते आपण करू शकतो. हे प्रत्येकजण करतं. एखादा बाबा चांगला आहे किंवा नाही हे सांगणारी व्यक्ती सुद्धा तशी असावी लागते . लोकांना कळायला पाहिजे की अशा ठिकाणी द्यायला पाहिजे की नाही.हे कळावं. हे सगळं सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आलाय. हा चित्रपट पाहिल्यानंतर नक्कीच लोकांना कळेल की, केवळ धागे दोरे बांधणारेच बाबा नसतात. त्यापेक्षाही घाणेरडे कृत्य करणारे असतात. हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, ते समोर येणे गरजेचे आहे. या प्रकरणात जे जे सहभागी आहेत त्या सगळ्यांच्या भूमिका तुम्हाला यात दिसतील. मग सुषमा अंधारे असू देत, अंजली दमानिया असतील त्या सगळ्यांच्या भूमिका असणार आहेत. प्रत्येकाचा छोटा मोठा वाटा आहे या चित्रपटात .त्यांनी येऊन बघा व स्क्रीनवर आपण कसे आहोत.”असेही अभिनेत्री दीपाली सय्यद म्हणाल्या. त्या tv9 शी बोलत होत्या.

हे प्रकरण समोर आलं त्यावेळी राज्यातील अनेक बडे राजकारणी, अधिकारी, प्रतिष्ठित लोक या भोंदू खरातचे भक्त असल्याचा समोर आलेलं. याच प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचे अशोक खरातशी आर्थिक संबंध असल्याचे उघडकीस आलं होतं. यातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली.  

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *