Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीला बसवून ठेवलं, गंभीरवर टीकेची झोड; दुसऱ्या T20 मध्ये तरी मिळणार का संधी ? – Marathi News | India vs Ireland : Fans Slam Iyer Gambhir; Will Suryavanshi Play in 2nd T20?


आयर्लंडविरुद्धच्या पराभवानंतर गंबीरवर भडकले क्रिकेट चाहते

शुक्रवारी आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये भारतीय क्रिकेट संघाला अत्यंत लाजिरवाणी हार स्वीकारावी लागली. या मॅचमध्ये वैभव सूर्यवंशीला संघात न घेण्याच्या निर्णयावर जोरदार टीका झाली. अनेक चाहत्यांनी कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर या दोघांवरही टीकेचा भडिमार केला. कालच्या मॅटमध्ये प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने 182 धावांची भक्कम धावसंख्या उभारली; प्रत्युत्तरात भारतीय संघ अवघ्या 148 धावांत ऑल आऊट झाला आणि भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

शुक्रवारी बेलफास्टमध्ये इतिहास घडला, पण तो भारतासाठी नकोसा इतिहास होता. कारण आयर्लंडने कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये प्रथमच भारताचा पराभव केला. गोलंदाजीच्या बाबतीत चांगली सुरुवात होऊनही, मधल्या षटकांमध्ये भारतीय संघाने खूप धावा दिल्या; विशेषतः, प्रसिद्ध कृष्णाने एकाच षटकात 27 धावा दिल्या. खरंतर, 183 धावांचे लक्ष्य फारसे कठीण नसतानाही, आयर्लंडच्या गोलंदाजीसमोर भारताचे दिग्गज फलंदाज सपशेल अपयशी ठरले. या टी 20- मॅचमधून वैभव सूर्यवंशी पदार्पण करेल अशी चर्चा सामन्यापूर्वी होती, मात्र तसं काहीच घडलं नाही. या लज्जास्पद पराभवानंतर संघावर आता चहूबाजूंनी टीका होत आहे.

दुसऱ्या मॅचमध्ये तरी खेळणार का वैभव सूर्यवंशी?

यानंतर तरी वैभव सूर्यवंशीला दुसऱ्या टी-20 मॅचमध्टये पदार्पण करण्याची संधी मिळावी, अशी मागणी चाहते सोशल मीडियावर करत आहेत. यापूर्वीही अशा मागण्या करण्यात आल्या होत्या, परंतु चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वगळणं हे मॅनेजनेंटला योग्य वाटलं नाही. पण आता संघाची वरच्या फळीतील फलंदाजी अपयशी ठरल्यामुळे, दुसऱ्या सामन्यात या 15 वर्षीय सलामीच्या फलंदाजाला खेळण्याची संधी मिळू शकेल, अशी आशा चाहत्यांना आहे.

कालच्या मॅचनंतर इंग्लंडचा कॅप्टन यानेही वैभव सूर्यवंशीला संघात न घेण्याबाबात आश्चर्य व्यक्त केलं, त्यांला प्लेईंग 11 मध्ये का समाविष्ट केलं नाही असा प्रश्न त्याने उपस्थित केला. तर अनेक क्रिकेट चाहत्यांनी गौतम गंभीरवर टीका करत आपला राग व्यक्त केला.

कधी आहे दुसरा टी 20 सामना ?

भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसरी टी-20 लढत ही रविवार, 28 जून रोजी होणार आहे. हा सामनाही बेलफास्ट येथील ‘सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब ग्राउंड’वर खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6 ाजता उद्या ही मॅच सुरू होईल.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *