Vastu Tips : राहू दोषापासून सुटका हवीय? तुमच्या घरातील रोपाची कुंडी ‘या’ दिशेला ठेवा, एका आठवड्यात फरक जाणवेल, वास्तूशास्त्र


Vastu Tips : वास्तूशास्त्रात, घरातल्या प्रत्येक छोट्या गोष्टींचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. असं म्हणतात की, घरातील वस्तू जर योग्य अवस्थेत आणि योग्य दिशेला ठेवली तर घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. तर, जर त्या वस्तू आपण चुकीच्या दिशेला ठेवल्या तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळेच वास्तूशास्त्रात वास्तूला फार महत्त्व आहे.

अशाच प्रकारे घरातील कुंडी आणि झाडांच्या संदर्भात काही वास्तू नियम सांगण्यात आले आहेत. यामुळे घराची सुंदरताच वाढणार नाही तर तुमच्या घरात सुख-शांती आणि सकारात्मक ऊर्जा पसरते.

झाडाची कुंडी रिकामी ठेवावी? 

वास्तूशास्त्रानुसार, घराच्या सजावटीत झाडांच्या कुंड्यांचं महत्त्व अनन्य साधारण आहे. अनेकदा लोक यामध्ये मनी प्लांट, सदाफुलीचं रोप, तुळस तसेच, स्नेक प्लांट लावतात. पण जर तुमच्याकडे एखादी कुंडी रिकामी असेल आणि तुम्ही सध्या त्यामध्ये कोणतं रोप लावणार नसाल तर त्याला घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवणं फार शुभ मानलं जातं. 

वास्तू शास्त्रानुसार, कुंडीत नेहमीच कोणतं ना कोणतं झाड लावणं शुभ मानलं जातं. जर तुम्हाला रोप लावणं शक्य होत नसेल तर त्यात माती किंवा छोटी दगडं घालून ठेवावीत. तसेच, तुम्हाला वाटल्यास तुम्ही त्यात सजावटीच्या वस्तू देखील ठेवू शकता. पण, लक्षात घ्या ती कुंडी रिकामी ठेवू नका. तसेच, रिकाम्या कुंडीला घराच्या अशा स्थानी ठेवा जी रोजच्या वापरात येत नाही. 

राहू दोषसुद्धा शांत होतो 

वास्तूशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात राहूशी संबंधित काही समस्या सुरु आहेत तर घराच्या दक्षिण दिशेला एक रिकामी कुंडी ठेवा. आणि त्यात सात वेगवेगळ्या प्रकारचे धान्य घाला. हा उपाय केल्यास तुम्हाला मानसिक तणावातून मुक्ती मिळेल. तसेच, नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होईल. तसेच, तुमच्या आरोग्यातही चांगली सुधारणा दिसेन येईल. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :                                                      

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Career Astrology : नोकरीत यश हवंय? पैशांची कमतरता भासतेय? तुमच्या कुंडलीत ‘हे’ ग्रह मजबूत असायला हवेत, जाणून घ्या ज्योतिषशास्त्र…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *