केतनला मृत्यूपेक्षाही द्यायची होती भयंकर शिक्षा, सियाचा गुप्त कट समोर येताच सर्वांना धक्का; पोलिसही चक्रावले! – Marathi News | Ketan agrwal murder case siya goyal and chetan chaudhary try to give slo poisonto ketan agrwal


Ketan Agarwal Murder Case : पुण्यातील कोट्यधीश केतन अग्रवाल या तरुण मुलाच्या हत्येनंतर राज्यभरात खळबळ उडाली. त्याची होणारी बायको सिया गोयल हिनेच कट रचून त्याला संपवलं. आपला बॉयफ्रेंड चेतन चौधरी याला सोबत घेत तिने केतनला लोहगडावरून ढकलून दिलं. यातच केतनचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलीस या हत्या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस चौकशीत आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. असे असतानाच आता पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारा सियाचा नवा कट समोर आला आहे. सिया गोयलने याआधीही चेतनला मारण्याचा भयंकर प्लॅन तयार केला होता.

‘स्लो पॉयझन’ देऊन त्याचा खून करण्याचा दोघांचा प्लॅन

सिया आणि केतन यांचं लग्न ठरल्यानंतर सियाने बॉयफ्रेंड चेतनला सोबत घेऊन केतनच्या हत्येचा कट रचण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला केतनला ‘स्लो पॉयझन’ देऊन त्याचा खून करण्याचा दोघांचा प्लॅन होता. तसेच केतनला कायमचं अपंग करण्याचा कट त्यांनी आखला होता. या कटाची अंमलबजावणी करण्याचाही सियाने प्रयत्न केला होता. मात्र त्यांना विष मिळालं नाही, त्यामुळे तो डाव फसल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

जपानी व्हिडीओ पाहून घेतली ट्रेनिंग

तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अटकेनंतर पोलिस चौकशीतून बचाव करण्यासाठी सिया आणि चेतन यांनी तब्बल दोन तासांचा जपानी व्हिडिओ पाहिल्याचं समोर आलं आहे. चौकशीदरम्यान शांत कसं राहायचं आणि प्रश्नांना कशा पद्धतीने उत्तर द्यायचं, याबाबत या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करण्यात आलं होतं. पोलिसांनी या दोन्ही व्हिडिओंच्या लिंकही सिया आणि चेतन यांच्या वेब हिसस्ट्रीमधून जप्त केल्याचा दावा केला आहे. दरम्यान, आता केतन अग्रवालच्या हत्या प्रकरणात ही नवी माहिती मिळाल्याने पोलिसांच्या तपासाला वेग येईल, असे बोलले जात आहे. त्यामुळे आता भविष्यात या प्रकरणात नेमकं काय घडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या सिया आणि चेतन हे कोठडीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *