मुंबईच्या मागाठाणे परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात, सहा वाहने एकमेकांवर आदळली, पोलीस घटनास्खळी दाखल


Mumbai Accident News :  मुंबईत भीषण अपघाताची घटना घडली आहे. मागाठाणे पश्चिम द्रुतगती महामार्गावर 6 वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. बोरीवली पूर्व येथील मागाठाणे परिसरात ही घटना घडली आहे. 5 कार आणि 1 बस एकमेकांवर आदळल्या आहेत. अपघातात काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अपघातानंतर पश्चिम द्रुतगती महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी

मुंबईच्या मागाठाणे पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात 6 वाहने ऐकमेकांवर आदळली आहेत. यामध्ये काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. अपघातानंतर पश्चिम द्रुतगती महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. 

नागपुरातील काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या कारचा मध्य प्रदेशमध्ये अपघात 

नागपुरातील काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या चारचाकी गाडीचा मध्य प्रदेशात काल रात्री भीषण अपघात झाला आहे. शुभम मोटघरे आपल्या सहकाऱ्यांसोबत मध्य प्रदेशातून परत येत असताना हरदा रोड वरील जंगलात कार समोर अचानक एक नीलगाय आली. समोर नीलगाय आल्याने ड्रायव्हरचे कार वरील नियंत्रण सुटले आणि गाडी तीन ते चार वेळा पलटी होऊन थेट पुलाखाली कोसळली. या अपघातात मोटघरे थोडक्यात बचावले, सुदैवाने कुठलीही जीवहानी झाली नाही.शुभम मोटघरे हे प्रभाग 26 चे नागपूर महानगर पालिकेचे नगरसेवक आहेत. 

समृद्धी महामार्गावर कार-पिकअपची जोरदार धडक; कार चालकाचा मृत्यू

वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर आज सयंकाळी कार आणि पिकअप वाहनामध्ये भीषण अपघात झाला आहे. धडक इतकी जोरदार होती की या अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावरील पोल क्रमांक 252/900 येथे नागपूरकडे जाणाऱ्या मार्गावर कार आणि पिकअप वाहनामध्ये अपघात झाला आहे. या अपघातात कारचालक सुरेंद्र खोटारे अकोला यांचा यामध्ये मृत्यू झाला. घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली असून मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालय, मालेगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहेअपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला हटविण्यात आली असून सध्या वाहतूक सुरळीत सुरु आहेअपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून पुढील तपास सुरु आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *