Suniel Shetty on Granddaughter: ‘साईबाबांच्या पोथीत पंतप्रधान मोदीजींचा फोटो, रोज पूजा अन् लाडू…’; सुनील शेट्टींचा 15 महिन्यांच्या नातीबद्दल भावनिक खुलासा


Suniel Shetty Opens Up About His Granddaughter: बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी (Suniel Shetty) सध्या आपल्या वक्तव्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. त्यांनी आपल्या नातीबद्दल भावनिक खुलासा केला आहे. सुनील शेट्टी यांनी मुलाखतीत सांगितलं की, त्यांची 15 महिन्यांची नात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची पूजा करते.   त्यांच्या फोटोला लाडूचा नैवेद्य दाखवते, असा भावनिक खुलासा खुद्द सुनील शेट्टी यांनी मुलाखतीत केला. सध्या त्यांची मुलाखतीत सोशल मीडियात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांच्या यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 

अलिकडेच सुनील शेट्टीने मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं.  तसेच आपल्या नातीबद्दल एक भावनिक खुलासा केला. आथिया शेट्टी आणि केएल राहूल यांची मुलगी इवारा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोची पूजा करते, असं त्यांनी सांगितलं. तसेच गोड पदार्थाचे नैवेद्य दाखवते.  सुनील शेट्टी यांनी मुलाखतीत हे देखील स्पष्ट केलं की, असं करण्यास त्यांनी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याने असं करण्यास सांगितलेलं नाही. तर, ती स्वत: या गोष्टी करते. 

सुनील शेट्टींनी सांगितला नातीचा गोंडस किस्सा (Suniel Shetty Opens Up About His Granddaughter)

मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाले, ‘मी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा चाहता आहे, असं सांगितलं आहे.  मी या ठिकाणी कोणत्याही पक्षाबद्दल भाष्य करत नाही. तर, एका नेत्याबद्दल बोलत आहे. मी जसं माझ्या देशावर प्रेम करतो. अगदी तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तितकं प्रेम आणि आदर आहे. तुम्ही विश्वास ठेवा अथवा ठेवू नका, माझी नात ही 15 महिन्यांची आहे. तिला फक्त एकदा नॅनीने पंतप्रधान मोदी यांचा फोटो एअरपोर्टवर दाखवला होता.  ती रोज सकाळी साईबाबांचं पुस्तक उघडते. त्यात पंतप्रधान मोदी यांचा फोटो आहे’.

‘पुस्तक उघडल्यानंतर ती पंतप्रधान मोदी यांचा फोटो पाहते आणि मोदीजी मोदीजी असे म्हणते. घरात एक गणपती बाप्पांची मूर्ती आहे. मुर्तीजवळून ती लाडू घेते. तसेच ती पंतप्रधान मोदी यांच्या फोटोला खाऊ घालते. फोटोला ती लाडू अर्पण करते. हे करायला तिला मी नाही सांगितलं, ना तिच्या आईने सांगितलं. फक्त नॅनीने एकदा तिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दाखवला होता.  या माणसामध्ये नक्कीच काहीतरी असेल ना…15 महिन्यांच्या मुलापासून ते 65 वर्षीय वृद्धांपर्यंत सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडतात’.

‘तिला आम्ही कधीच पंतप्रधान मोदीजींबद्दल सांगितलेलं नाही. 15 महिन्यांची माझी नात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर इतकं आदराचं वर्षाव करत असेल तर, त्यांच्यात नक्कीच काहीतरी जादूई आहे’, असं मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाले.  आथिया शेट्टी आणि  केएल राहुल  यांना लग्नानंतर 2025 साली मुलगी झाली. सुनील शेट्टी आपल्या नातीच्या खूप जवळ आहेत. ते अनेकदा मुलाखतींमध्ये तिचा उल्लेख करतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

हजारो रसिकांना वेड लावणाऱ्या विठाबाई नारायणगावकरांचा वेदनादायी शेवट; हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठीही नव्हते पैसे





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *