पुण्याच्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता नवीन अपडेट समोर आली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना क्राईमची थिअरी जाणून घेण्यासाठी गुप्तपणे शुक्रवारी लोहगढ येथे नेण्यात आले होते. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ११ वाजता लोहगड किल्ल्याजवळ दोन्ही आरोपींना नेण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी या दोघांना समोरासमोर आणि स्वंतत्रपणे काही प्रश्न विचारले आहेत.
पुण्यातील उद्योजकाचा पूत्र असलेल्या केतन अग्रवाल याची त्याच्या होणाऱ्या पत्नीने बॉयफ्रेंडच्या मदतीने कट रचून लोहगडावरुन ढकलून हत्या केल्याने देशभरात हे प्रकरण गाजत आहे. या प्रकरणातील क्राईम सीन रिक्रीए करण्यासाठी मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना लोहगडावर नेण्यात आले. त्यावेळी त्यांनी कोणत्या रस्त्याचा वापर केला हे देखील पोलिसांनी त्यांना विचारले.
या किल्ल्यावर पोहचण्यासाठी दोन वेगवेगळे मार्ग आहेत. सिया आणि चेतन यांना विचारले गेले त्यांनी कोणता मार्ग निवडला होता. गुन्हा घडल्याचे ठिकाण आणि घटनास्थळ तसेच मार्ग यांची ओळख आणि तपासणी केल्याने पोलिसांना आरोपींना पुन्हा पोलिस ठाण्यात नेले. सूत्रांनी सांगितले की आता येत्या काही दिवसात सिया गोयल हिच्या आई-वडीलांची जबानी नोंदवली जाऊ शकते.
या दरम्यान सिया गोयल संदर्भात नवीन माहिती उघडकीस आली आहे.केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी आरोप केला आहे की लग्न ठरण्याआधी सियाच्या कुटुंबाने तिच्या सवयी आणि शिक्षणाची चुकीची माहिती दिली. विशाल अग्रवाल यांनी सांगितले की जेव्हा दोन्ही कुटुंबाच्या दरम्यान नाते ठरत होते तेव्हा त्यांनी सांगितले की सिया बी.कॉम झाली आहे. आणि लवकरच स्वत:चा बेकरीचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत आहे.
केतनच्या वडीलांच्या मते पोलीस तपासा दरम्यान समोर आलेल्या माहितींनी त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी दावा केला की तपासात कळले की सिया केवळ १० वी पास आहे. आणि १२ वीची परीक्षा पास देखील झालेली नाही. विशाल अग्रवाल यांच्या मते ही माहिती आमच्यापासून दडवण्यात आली होती.
‘सिया हिच्या वाईट सवयींनी कुटुंब त्रस्त ’
केतन याचे वडील विशाल अग्रवाल यांनी सांगितले की सिया दारु पिण्यासह अनेक वाईट सवयी होत्या आणि तिचे कुटुंब तिच्या या वागण्याने त्रस्त होते. त्यांनी दावा केला की यामुळे कुटुंबाने एका चांगल्या आणि श्रीमंत कुटुंबात तिचे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे तिच्या सवयी दूर होतील. याच विचारात सियावर तिच्या कुटुंबाने विवाहासाठी दबाव टाकला होता. मात्र, या दाव्यांना पोलिसांना अद्याप दुजोरा दिलेला नाही. आणि पोलिसांनी देखील याबाबत काही वक्तव्य केलेले नाही. केतन याला ४०० फूटांवर ढकलून त्याची हत्या केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी सिया आणि चेतन यांना अटक करुन त्यांच्या रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.दोघांनी मिळून केतन याची हत्या केली असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.सध्या प्रकरणाचा तापस सुरु असून सर्व अँगलने पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.