Mosquito Repellent Plants: आला पावसाळा… डास असे पळवा… ही झाडं लावताच चमत्कार होणार – Marathi News | Mosquito Repellent Plants The monsoon arrival drive away mosquitoes from home plant these and it works like magic naturally gardening tips basil lavender lemon balm rosemary peppermint lemongrass


आला पावसाळा… डास असे पळवा

Mosquito Repellent Plants: पावसाळा आला की डासांचा मोठा त्रास होतो. रात्रंदिवस हे मच्छर कानाभोवती गुणगुण करतात. मच्छरांच्या दंशामुळे खाज सुटते आणि कामात मन लागत नाही. अशावेळी मच्छर मारण्यासाठी रासायनिक कॉईल्स, अगरबत्ती, स्प्रेचा वापर केल्यास त्रास होतो. श्वसनाचा त्रास होतो. डोकेदुखीचा त्रास होतो. पण तुम्ही नैसर्गिक पद्धतीने डास पळवू शकता. ही झाडं तुमच्या बगिच्यात लावल्यास, कुंडीत लावल्यास डास घरात शिरण्यापासून अटकाव करतील.

तुळस (Basil) : तुळस ही घरासमोर असते. तुळस कुंडीत सहज उगते. धार्मिक कारणामुळे तुळस घरासमोर लावली जाते. तुळशीमुळे डास घरापासून दूर राहतात.

लॅव्हेडर (Lavender) : लॅव्हेंडरचा सुगंध हा अनेकांना भावतो. त्याचा सुवास घराच्या अवतीभोवती दरवळतो. या झाडाचे नैसर्गिक तेल डाझांना दूर ठेवण्यास मदत करते. हे झाड मधमाशी आणि फुलपाखरांना आकर्षित करते.

पुदिना (Lemon Balm) : पुदिना तर हा गुणकारी आहे. पुदिनाचे झाड हे घराच्या कुंडीत असणे आरोग्यासाठी फायद्याचे आहे. यातील सिट्रोनेलल अनेक गोष्टीत उपयोगी ठरते. नैसर्गिक पर्याय म्हणून त्याचा औषधात वापर होतो.

रोजमेरी (Rosemary) : रोजमेरीचा केवळ खाण्यासाठीच वापर होतो असे नाही तर डास दूर ठेवण्यासाठी या झाडाचा वापर होतो. रोजमेरीच्या सुकलेल्या काड्या जाळल्यास छान वास येतो आणि डासही दूर पळतात.

पेपरमिंट (Peppermint) : पेपरमिंटचा तीव्र वास अनेक किटकांसाठी जीवघेणा ठरतो. पेपरमिंटचे झाड अंगणात असल्यास मच्छरच नाही तर अनेक कीटक दूर पळतात. त्यामुळे अनेक जण बाल्कनीत हे झाड लावतात.

लेमनग्रास (Lemongrass) : लेमनग्रास तर अनेक कीटकांसाठी कर्दनकाळ मानली जाते. मच्छर, इतर कीटक दूर ठेवण्यासाठी हा एक सर्वोत्तम उपाय मानल्या जातो.

लसूण (Garlic) : लसूणचा तीव्र वास अनेकांना सहन होत नाही. लसूण झणझणीत असतो. लसूण कुंडीत लावल्यास दुहेरी फायदा होतो. जेवणातही स्वाद वाढतो आणि मच्छरही दूर पळतात.

डास मारण्याचे औषध घरीच करा तयार

डासांना पळवण्यासाठी मुठीत मावतील इतकी काद्यांच्या काचोळ्या घ्या. म्हणजे वाळलेला पापुद्रा घ्या. 10-15 लवंग हाताशी ठेवा. मुठभर लिंबाची सुखलेली पानं लागतील. मुठभर तेजपत्ता लागेल. तो मसाल्यात सापडेल. 10 कापूर वड्या लागतील. आता सर्वात अगोदर लिंबाची पानं आणि कांद्याच्या काचोळ्या घ्या. ही सुखलेली पानं एकत्र करा. मिक्सरमधून त्याची पूड तयार करा. त्यात लवंग,तेजपत्ता हे पण टाका. आता चांगली बारीक पावडर तयार करा. हवं तर त्यात थोडी मिरचीच पूड टाकू शकता. पण त्यामुळे ठसका लागू शकतो. आता कापूर बारीक करून त्यात टाका.

अखेरच्या टप्प्यात आता एका पणतीत मोहरीचे तेल टाका. त्यात अगदी किंचित मीठ टाकून तयार केलेली ही सर्व पूड थोडी टाका. सूर्य मावळतीला आला. दिवे लागणीची वेळ झाली की हा दिवा पेटवा. या तीव्र वासाचा परिणाम होईलच. घरातील वातावरण प्रसन्न होईल. वातावरण शुद्ध होईल. तर मच्छरही पळून जातील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *