राजस्थान रॉयल्सने मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला 30 धावांनी पराभूत करून आयपीएल 2026 च्या प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. या महत्त्वपूर्ण सामन्यात वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा एक मोठी आणि स्फोटक खेळी करेल अशी सर्वांना अपेक्षा होती. पण वैभव केवळ 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. फलंदाजीतील निराशेने वैभवला स्वतःवर हावी होऊ दिले नाही आणि त्याने क्षेत्ररक्षणाचा एक उल्लेखनीय विक्रम प्रस्थापित केला.
Hardik Pandya: ‘हार्दिककडून कर्णधार म्हणून अपेक्षेसारखी कामगिरी झाली नाही, पुढील वर्षी संघात बदल होणार’, पॉलार्डनं मनातलं सगळं सांगून टाकलं
आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला संघ व्यवस्थापनाने या हंगामातील बहुतेक सामन्यांमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून वापरले आहे. या धोरणामुळे त्याला क्षेत्ररक्षण करण्याची फार कमी संधी मिळाली. अनेकांनी वैभवच्या फिल्डिगवर प्रश्न उपस्थित केले. वैभव फक्त फलंदजी करतो मग त्याची फिल्डिंग कशी सुधारणार असे बरेच आरोप दिग्गजांनी केले.
यानंतर मात्र, मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यासाठी राजस्थान रॉयल्सने फलंदाजीच्या क्रमात शुभम दुबेला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवले, पण नंतर त्याच्या जागी अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाला संधी देण्यात आली. या धोरणात्मक फेरबदलामुळे वैभव सूर्यवंशीला या सामन्यात क्षेत्ररक्षण करण्याची सुवर्णसंधी मिळाली. जेव्हा राजस्थान रॉयल्सने ठेवलेले लक्ष्य गाठण्यासाठी मुंबई इंडियन्स मैदानात उतरली, तेव्हा डावाच्या चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हा ऐतिहासिक क्षण घडला. मुंबईचा फलंदाज रायन रिकी पाँटिंगने राजस्थानचा वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गरच्या गोलंदाजीवर मिडविकेटच्या दिशेने एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. अचूक ठिकाणी असलेल्या वैभव सूर्यवंशीने एक अप्रतिम झेल घेतला. वैभवने हा झेल फकडून त्याच्या फिल्डिंगवर बोलणाऱ्यांची तोंड बंद केली आहेत.
या झेलमुळे वैभव सूर्यवंशीने आयपीएलच्या इतिहासात एक नवीन विक्रम रचला आहे. तो आयपीएलच्या इतिहासात झेल घेणारा सर्वात तरुण क्षेत्ररक्षक ठरला आहे. त्याने अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमानचा जवळपास आठ वर्षे जुना विक्रम मोडत, वयाच्या अवघ्या 15 वर्षे आणि 58 दिवसांत ही कामगिरी केली. मुजीबने 2018 च्या आयपीएल हंगामात किंग्स इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्स) कडून रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्ध खेळताना वयाच्या 17 वर्षे आणि 16 दिवसांत झेल घेतला होता.
आयपीएलच्या इतिहासात झेल घेणाऱ्या सर्वात तरुण खेळाडूंच्या यादीत, वैभव सूर्यवंशीने आता अव्वल स्थान पटकावले आहे. त्याच्या पाठोपाठ, मुजीब उर रहमान दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. राजस्थान रॉयल्सचाच रियान पराग या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, त्याने 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध वयाच्या 17 वर्षे 163 दिवसांत झेल घेतला होता. चौथ्या क्रमांकावर प्रदीप संगवान आहे, ज्याने 2008 मध्ये उद्घाटन हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्ध वयाच्या 17 वर्षे 181 दिवसांत हा पराक्रम केला होता. या यादीत वॉशिंग्टन सुंदर पाचव्या क्रमांकावर आहे, ज्याने 2017 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंटकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध झेल घेतला होता.