Kantara Fame Rukmini Vasanth: लोकप्रिय कन्नड सिनेमांमध्ये झळकणारी अभिनेत्री रुक्मिणी वसंत (Rukmini Vasanth) काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिचे काही एआय निर्मित फोटो (AI Generated Images) आणि व्हिडीओज सोशल मीडियात व्हायरल झाले होते. दरम्यान, बंगळूरू सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांना आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे. पोलिसांनी हे घाणेरडे कृत्य केल्याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. अभिनेत्रीची इमेज (Entertainment) खराब करण्यासाठी तसेच तिची बदनामी करण्याच्या उद्देशाने आरोपींनी हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. फेक इमेज तयार करण्यासाठी आरोपींनी एआय टूल्सचा वापर केला असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईदरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून तीन मोबाईल फोन जप्त केले असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
रुक्मिणी वसंतचे नको ते फोटो सोशल मीडियात व्हायरल (Actress Rukmini Vasanth Files Complaint over Morphed Photos)
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, रुक्मिणी वसंतने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला. तसेच तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. अभिनेत्रीने स्पष्ट केले की, तिचे मॉर्फ केलेले फोटो बनावट होते. तसेच टेक्नोलॉजीचा गैरवापर केल्याप्रकरणी आरोपींवर कायदेशीर कारवाईची मागणी तिने केली आहे. इ्ंटरनेटवर तिचे एआय निर्मित फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीने तीव्र नाराजी व्यक्त केली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी ‘कांतारा: चॅप्टर 1’ या सिनेमातील अभिनेत्रीची बदनामी करण्याच्या आणि तिची इमेज खराब करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केलं. आरोपींनी एआयचा वापर करुन तिचे मॉर्फ फोटो तयार केले. तसेच ऑनलाइन शेअर केले. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी सखोल तपास केला असून, आरोपींचे 3 मोबाईलही जप्त केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीचे काही बिकीनीतील मॉर्फ केलेले फोटो आरोपींनी सोशल मीडियात व्हायरल केले होते. रुक्मिणीने सांगितले की, व्हायरल होत असलेले तिचे फोटो बनावट असून, टेक्नोलॉजीचा गैरवापर केल्याप्रकरणी तिनं तीव्र नाराजी व्यक्त केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपींना ज्यूडिशियल मजिस्ट्रेटसमोर उभं करण्यात. तसेच त्यांना अटक करण्यात आली. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, या प्रकरणी आणखी कुणाचा हात होता का? याचा तपास पोलीस करीत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
क्रेझ काही कमी होईना; 31 व्या दिवशीही ‘देऊळ बंद 2’ची दमदार कमाई, किती रुपयांचा गल्ला जमवला?
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष