Vaibhav Sooryavanshi : कॅप्टन-व्हाईस कॅप्टन राहिले बाजूला, एकट्या वैभवसाठी LIVE दाखवणार टीम इंडियाची मॅच! | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


ट्राय सीरिजमध्ये फायनलसह एकूण 7 मॅच गोणार आहेत. तिलक वर्माला या ट्राय सीरिजसाठी इंडिया ए चं कॅप्टन करण्यात आलं आहे. सोनी स्पोर्ट्स टीव्ही चॅनल आणि सोनी लिव्ह ऍपवर हे सामने लाईव्ह दाखवले जाणार आहेत.

सूर्यवंशीचे आयपीएलमध्ये सर्वाधिक रन

आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक 776 रन केले होते, त्यामुळे त्याला ऑरेंज कॅपही मिळाली. याशिवाय त्याला मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर, इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर, सुपर स्ट्रायकर, सिक्सर हे पुरस्कारही मिळाले.

सोनी नेटवर्क मागच्या काही काळापासून क्रिकेट ऍक्शनपासून लांब आहे, कारण टी-20 वर्ल्ड कप आणि आयपीएल जियो हॉटस्टारवर होतं. आता इंडिया ए ची ट्राय सीरिज, इंग्लंड-न्यूझीलंड सीरिज, भारत-श्रीलंका सीरिज सोनी वर दिसणार आहे. तर लंका प्रीमीयर लीग मात्र जियो हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

ट्राय सीरिजचं वेळापत्रक

ट्राय सीरिजचा पहिला सामना 9 जूनला भारत ए आणि श्रीलंका ए यांच्यात होईल. यानंतर इंडिया ए 11 जूनला अफगाणिस्तान आणि 15 जूनला श्रीलंका आणि 17 जूनला पुन्हा अफगाणिस्तानविरुद्ध खेळेल. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू होतील.

इंडिया ए दोन टेस्टही खेळणार

25 जूनपासून भारत ए आणि श्रीलंका ए यांच्यात 2 टेस्ट मॅचची सीरिजही होणार आहे. तसंच 3 टी-20 सामने खेळवण्याचा विचारही सुरू आहे. बीसीसीआय आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टी-20 सीरिज व्हायची शक्यता आहे. टेस्ट सीरिजसाठी अजून टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही.

वनडे ट्रायसीरिजसाठी टीम इंडिया ए

तिलक वर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, आयुष बदोनी, निशांत सिंधू, सुर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग, कुमार कुशाग्र, विप्ररज निगम, यश ठाकुर, युधवीर सिंग, अंशुल कंबोज, अरशद खान, अनुकूल रॉय



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *