Uddhav Thackeray Siddharth Deole वाशिम : ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात दौरा सुरु केला आहे. उद्धव ठाकरेंनी यवतमाळमध्ये सभा घेतल्यानंतर वाशिममध्ये देखील सभेला संबोधित केलं. यानंतर त्यांची हिंगोली येथे देखील सभा पार पडली आहे. मात्र, वाशिमच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाषण संपवत असातना डॉ. सिद्धार्थ देवळे यांना मंचावर बोलावत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आदेश दिले. सिद्धार्थ देवळे यांना वाशिम विधानसभा मतदारसंघातून तयारी करण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी तीन वर्ष अगोदरच दिल्यानं त्यांच्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे काय म्हणाले?
यवतमाळ वाशिम हा आपला लोकसभा मतदारसंघ आहे. आतापर्यंत काय व्हायचं, संपर्ण मतदारसंघात खासदार यायचा, तो खाली तू वरती मी असं सेटिंग करायचा.खाली एकच यायचा तो म्हणायचा खाली मी वरती तू, आता असं नाही. आता मला आमदार पण पाहिजे आणि खासदार पण पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सिद्धार्थ देवळे यांना गेल्या वेळी 1 लाख 4 हजार मतं मिळाली होती, वाशिम मतदारसंघात पुढील वेळी त्यांना आमदार करायची जबाबदारी तुमची आहे. आतापासून तयारीला लागा, निवडणुकीसाठी जी बांधणी करावी लागते, ती करा, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
Siddharth Deole : कोण आहेत डॉ.सिद्धार्थ देवळे?
डॉ.सिद्धार्थ आकारामजी देवळे वैद्यकीय व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांनी एम.बी.बी.एस एमडी मेडिसिन शिक्षण पूर्ण केलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल होण्यापूर्वी ते वंचित बहुजन आघाडीत कार्यरत होते. डॉ. देवळे यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडी कडून लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. डॉ. देवळे यांना त्यावेळी 53 हजारांच्या जवळपास मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम विदर्भ प्रमुख या पदावर डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी पाच वर्ष काम केलं. सिद्धार्थ देवळे 2024 मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात दाखल झाले. त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवली आणि 1,04,000 मत मिळवत दुसऱ्या क्रमांकावर राहिले. 20 हजार मतांच्या फरकाने डॉ. सिद्धार्थ देवळे यांचा पराभव झाला होता. सध्या ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वाशिम जिल्हा समन्वयक असून उद्धव ठाकरेंनी त्यांना 2029 च्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करण्यास सांगितलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी वाशिमच्या सभेत डॉ. सिद्धार्थ देवळे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता शिवसैनिक मतदारसंघात कशा प्रकारे तयारी सुरु करतात ते पाहावं लागेल.
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा ‘तो’ जुना व्हिडिओ