सध्या देशात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरु आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी या आंदोलकांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यासाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे CJPचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात अनेक विरोधी पक्ष नेते सहभागी झाले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे देखील काल या आंदोलनात सहभागी झाले. मुंबईत आल्यानंतर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी जंतर मंतर येथील आंदोलनाची काय परिस्थिती आहे ते सांगितले आहे.
माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘एक गोष्ट नक्की हा विषय नीट पुरता नाही. खासदार माझ्यासोबत होते. एक व्यक्ती संजय राऊतला भेटला. त्याला विचारलं बिहारहून आलो. पण मध्यप्रदेशचा आहे. तो मध्यवयीन होता. त्याचा व्यवसाय नीट सुरू होता. पण नोटबंदीत त्याचा व्यवसाय उद ध्वस्त झालं. मी राग व्यक्त करायला आलो आहे. हा राग व्यक्त करायला लोक आले आहे. न्यायालयाला या प्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. दिल्लीत मला सुद्धा काही मुली भेटल्या. त्या संतप्त होत्या. आमचे कपडे फाडले, मारलं गेलं. लाठ्या काठ्यांना गंजलेले खिळे लावून मारले गेले, डोकी फोडली, असं मुलींनी सांगितलं. काल एक मुलगी अस्वस्थ होती. एक एक अत्याचार वाढले आहे. न्यायालयाला कुत्रे, कबुतरे पाहण्यासाठी वेळ आहे. पण कॉकरोचकडे पाहाला वेळ नाही.’
“पंतप्रधानांनी ट्विट केलं. त्यांनी बोलायला हवं होतं”
पुढे ते म्हणाले, हे दुर्भाग्य आहे. देशाची परिस्थिती आणि न्यायालयाची परिस्थिती धृतराष्ट्रासारखी झाली आहे का. द्रोपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखं झालं आहे. मध्यंतरी चंद्रचूड यांनी न्यायदेवतेची पट्टी काढली होती. ती न्यायदेवतेने परत बांधली का, कशासीठी बांधली आहे. सरकार आपलं वाटत नाही. आता विषय़ प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता नाही. हे सराकर नकोसं झालं आहे विद्यार्थ्यांना. याच विद्यार्थ्यांनी सरकारला निवडून दिलं आहे. पंतप्रधानांनी ट्विट केलं. त्यांनी बोलायला हवं होतं. कमीपणा बाळगण्याची गरज नव्हती. आपली मुलं आहेत. चर्चा करायला हवी होती. पहिल्याच दिवशी या मुलांशी बोलायला हवं होंत. लोकांना राग व्यक्त करायचा आहे. इतक्या दिवसाचा राग उफाळून आला आहे. त्याला वाट मोकळी करून देण्याचं काम करत आहे.
“सिव्हिल ड्रेसमधील गुंडांच्या हातात पोलिसांच्या लाठ्या”
सिव्हिल ड्रेसमधील गुंडांच्या हातात पोलिसांच्या लाठ्या आल्या. पोलिसांची नावेही नाही. हे आंदोलन मोडायला पाकिस्तानमधून भाजपने गुंड आणले का. हे गुंड निर्विकार पाहत आहेत. बेसुमार लाठीमार करत आहेत. ही गुंडगर्दी सुरू असताना कोणी गप्प बसू नये. राग व्यक्त करण्यासाठी आम्ही ताकद दाखवण्यासाठी मोर्चाचं आयोजन केलं आहे. सिद्धीविनायकाला सांगू या सरकारला सुबुद्धी दे नाही तर या देशावर सरकारच्या नावाने आलेलं आरिष्ट दूर कर असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले.