Tukaram Mundhe Majha Katta : मी मर्यादेत आणि कायद्यात राहूनच काम करत असल्याचे मत अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले. कोणत्याही पोस्टवर मी ज्यावेळी जॉईन होतो, त्यावेळी माझी भूमिका काय असेल? हे अगोदर समजून घेतो. त्याचा उद्देश काय हे समजून घेतो. सेफ फूड सेफ ड्रग हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ते करण्याची जबाबदारी व्यवसायिकांची आहे. तर ते व्यवस्थित करतात की नाही हे पाहण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाची असल्याचे तुकाराम मुंढे म्हणाले. तुकाराम मुंढे हे आज एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर आले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
जे प्रामाणिकपणे नियमाने काम करतात त्यांना काहीही भीण्याचे कारण नाही
लोकांना चांगले आणि सुरक्षीत अन्न मिळण्यासाठी काय करावं लागेल, या दृष्टीने आम्ही काम करायला सुरुवात केल्याचे तुकाराम मुंढे यावेळी म्हणाले. सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन आहे. हे मिशन पूर्ण करण्यासाठी आम्ही धोरण ठरवले आहे. ते धोरणामध्ये लोकांना कळलं पाहिजे की FDA नेमकं करत काय? त्यांची जबाबदारी काय आहे असे मुंढे म्हणाले. अधिकाऱ्यांना सांगतो की तुम्ही नियमाप्रमाणे काम करा त्रास होणार नाही. त्यानंतर जे प्रामाणिकपणे नियमाने काम करतात त्यांना काहीही भीण्याचे कारण नाही. पण जे चुकीचं काम करतात, त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे मुंढे म्हणाले.
कारवाया कशी केली जाते?
कारवाया नेमक्या कशा केल्या जातात? याबाबत देखील तुकाराम मुंढे यांनी माहिती दिली आहे. यामध्ये आमच्याकडे येणाऱ्या तक्रारी, आम्हाली मिळणारी गुप्त माहिती, आम्हालामिळणारा डेटा या सगळ्यांचा एकत्रित विचार करुन आम्ही कारवाई करतो असे मुंढे यांनी सांगितले.
प्रत्येक संकटात माझे कुटुंब माझ्या पाठिशी उभे राहिले
शिक्षणाबरोबच संस्कार देखील महत्वाचे आहेत असे मुंढे म्हणाले. माझ्यावर आलेल्या प्रत्येक संकटात माझे कुटुंब माझ्या पाठिशी उभे राहिल्याचे मत तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले. खाण्याबद्दल मोठी अनास्था आहे. त्यामुळं यामध्ये जागृती होणं गरजेचे आहे. विकत घेताना किंमत आणि एस्पायरीच बघतो पण त्यावर काय काय लिहलं आहे हे पाहणं गरजेचं आहे असे मुंढे म्हणाले. त्यामुळं नागरिकांनी प्रश्न करणे गरजेचं आहे, घेणारी वस्तू योग्य आहे का? हे पाहणं गरजेचं आहे असे मुंढे म्हणाले. आपण काय खातो पितो यावर आपलं आरोग्य अवलंबून आहे. अनेक आजारांचे प्रमाण वाढले आहेत असे मुंढे म्हणाले.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट