ओल्ड जाम नावाच्या रमचा 750 Ml चा खंबा हा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास ८८० रुपयांना मिळतो. जेव्हाा ही दारू ओल्ड जामच्या फॅक्टरीमध्ये तयार होते, तेव्हा प्रोडक्शन किंमत ही जवळपास 70 ते 90 रुपये इतकी असते. फॅक्टरीतून बाहेर पडल्यावर हीच किंमत 110 ते 130 रुपये इतकी होते. कारण, ही दारू ‘आयएमएफएल’ (IMFL- Indian Made Foreign Liquor) श्रेणीमध्ये येते. यामध्ये कंपनीकडून स्पिरीट, बाटली, लेबल, टोपण आणि पॅकेजिंग खर्च जोडलेला आहे.
