Pratap Sarnaik: ‘ऑपरेशन टायगर सुरूच असतं, कोणाला त्यांच्या पक्षात आवडत नसेल तर आमचे दरवाजे कायम खुले’; मंत्री प्रताप सरनाईकांच सूचक प्रतिक्रिया, म्हणाले…


Pratap Sarnaik on Operation Tiger : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार फुटणार आणि ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. रविवारी ‘मातोश्री’ (Matoshree) वर झालेल्या बैठकीला केवळ 5 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर 4 खासदार ऑनलाइन (Online) जोडले गेले होते. यानंतर खासदार संजय देशमुख यांनी दिल्ली गाठून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. या सर्व घडामोडींवर बोलताना राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) संदर्भात भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. ‘ऑपरेशन टायगर’ सुरुच असतं नगरसेवक, खासदार, आमदार यांचा प्रवेश होणे काही फक्त  ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) टायगर नाही, असेही प्रताप सरनाईक म्हणाले.

सर्वसामान्य कार्यकर्ता येणं देखील ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) आहे. कोणाला त्यांच्या पक्षात आवडत नसेल तर आमचे दरवाजे कायम खुले आहेत. आम्ही 40 आमदार एकनाथ शिंदे साहेबांसोबत एकत्र आलो. त्यामुळे पुढे काय होईल सांगता येत नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरणा घेतलेली आम्ही लोकं आहोत. त्यांनी तसा विचार केला तर विचार करु, असेही प्रताप सरनाईक म्हणाले. वर्धापन आणि पक्षप्रवेश असं एकत्रित करुन चालणार नाही. असेही ते म्हणाले.

Pratap Sarnaik on Operation Tiger : ……तर त्यांच्यासाठी आमचे दरवाजे कायम उघडे

आमची भूमिका स्पष्ट आहे, बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे कोणीही असेल आणि एकनाथ शिंदेंचे नेतृत्व मान्य असेल तर त्यांच्यासाठी आमचे दरवाजे कायम उघडे असती. उद्याचा वेळ कार्यकर्त्यांना बघायचा नसेल आणि लगेच प्रवेश घ्यायचा असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. आम्ही आमचे दरवाजे बंद करु शकत नाही. एकनाथ शिंदे आज देखील रात्री 2 वाजता कार्यकर्त्यांना आशीर्वाद देतात. कार्यप्रणाली जर आवडत असेल तर त्यांचे स्वागत आहे. कोणी खासदार काय बोलतंय हे आम्हाला माहिती नाही. असेही प्रताप सरनाईक म्हणाले

Pratap Sarnaik : आमची खंत आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकली आहे

नवी मुंबई महानगर पालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात पुन्हा कलगीतुरा रंगला आहे. नवी मुंबई मनपातर्फे उद्या वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विविध आरोग्य विषयक सुविधांचा उद्घाटन सोहळा होणार आहे. मात्र कार्यक्रम पत्रिकेवर उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नावचं छापलेलं नाही. यावर बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले कि, आमची खंत आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकली आहे. गेल्या कॅबिनेटमध्ये देखील आम्ही मुख्यमंत्री यांना सांगितलं होतं. पालकमंत्री अध्यक्षपदी ठेवला जातो. प्रधान सचिव आणि मुख्यमंत्री यांना विनंती केली आहे. जिल्हा परिषद, पालिका वगैरे सगळ्यांना सांगितलं आहे, प्रोटोकाॅलचे पालन झाले पाहिजे. महायुतीत यावरुन वाद नको, अशा सूचना दिल्या आहेत, असेही ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *