बॉलिंग बघून संघात घेतलं, पण पठ्ठ्याने बॅटींगमध्ये धुमाकुळ घातला, टीमला पराभूत होण्यापासून रोखलं, VIDEO | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

खेळाडूच्या बॉलिंग बघून त्याला संघात घेतलं पण त्याने बॅटीने मैफिल लुटली आहे आणि टीमचा पराभूत होण्यापासून रोखलं आहे.या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

manav Suthar
manav Suthar

County Cricket : एखाद्या खेळाडूला त्याची बॉलिंग किंवा बॅटींग बघून संघात घेतलं जातं.ऑलराऊंडर खेळाडूच्या बाबतीत मात्र सर्वच पैलू तपासले जातं, जसं बॅटींग, बॉलिंग आणि फिल्डींग त्यानंतर त्याचीच निवड होते. मात्र या सामन्यात एका टीमसोबत भलतच घडलं आहे. त्याचं झालं असं की खेळाडूच्या बॉलिंग बघून त्याला संघात घेतलं पण त्याने बॅटीने मैफिल लुटली आहे आणि टीमचा पराभूत होण्यापासून रोखलं आहे.या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.त्यामुळे नेमकं काय घडलं आहे? हे जाणून घेऊयात.

खरं तर हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा स्पिनर गोलंदाज मानव सुथार आहे. मानव सुथारने नुकताच अफगाणिस्तान विरूद्द एकमेव टेस्ट सामन्यात डेब्यू केला होता. या डेब्यू सामन्याच्या पहिल्या डावातच त्याने एकट्याने 6 विकेट काढल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याला एक विकेट मिळाली होती.अशाप्रकारे त्याला प्लेअर ऑफ द मॅच मिळाली होती.

अफगाणिस्तान विरूद्ध एकमेव सामन्यातील त्याची गोलंदाजी पाहून काऊंटी क्रिकेटमधील वॉर्विकशायर टीमने त्याच्या सोबत करार केला आणि त्याला स्पर्धेला बोलावून घेतले होते. यावेळी त्याला यॉर्कशायर विरूद्ध सामन्यात डेब्यू करायची संधी मिळाली होती. या संधीच सोन करत त्याने दिमाखदार कामगिरी केली.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर यॉर्कशायरने पहिल्या डावात 469 धावा केल्या होत्या. यामध्ये विलियम लक्षटनने 167 धावांची खेळी केली होती. या खेळीत वॉर्विकशायरकडून मानव सुथारने 3 विकेट घेतले होते,त्याच्यासोबत ईड बर्नाड आणि इथन बाम्बरने प्रत्येकी 3 विकेट आणि ऑलिवरने एक विकेट घेतली.त्यानंतर वॉर्विकशायर पहिल्या डावात 263 वर ऑलआऊट झाली होती. वॉर्विकशायरकडून ईड बर्नाडने 83 धावांची नाबाद खेळी केली होती.

आता आधीच यॉर्कशायरने 206 धावांची आघाडी घेतली होती. त्यात दुसऱ्या डावात 246 धावा करून वॉर्विकशायरसमोर 452 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करणे सहज सोप्पे नव्हते.तरी देखील वॉर्विकशायरने 300 हून अधिक धावा केल्या.यावेळी मानव सुथारने बॅटीने ही दमखम दाखवला. मानव सुथार 39 बॉलमध्ये 37 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार मारले होते. त्याच्या या खेळीमुळे वॉर्विकशायरवरचा पराभव टळला होता.कारण यॉर्कशायरला विजयासाठी दोन विकेट हव्या होत्या,त्यावेळी मानव सुथारने मैदानावर टीकून सामना ड्रॉ करत पराभव टाळला होता.त्यामुळे मानव सुथारने बॅटींगमध्येही कमाल करून दाखवली होती.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/

बॉलिंग बघून संघात घेतलं, पण पठ्ठ्याने बॅटींगमध्ये धुमाकुळ घातला, टीमला पराभूत होण्यापासून रोखलं, VIDEO



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *