“मी सावित्रीबाई…”नंतर लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेबद्दल स्टार प्रवाहचा मोठा निर्णय, नव्या मालिकेच्या प्रोमोने नव्या चर्चा


Star Pravah Marathi Serial: स्टार प्रवाह वाहिनी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. टीआरपीच्या स्पर्धेचे टिकून राहण्यासाठी वाहिनीने नव्या कोऱ्या आठ मालिकांची घोषणा केली. त्यासोबत काही मालिका आता संपणार आहेत. ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ‘मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण आता स्टार प्रवाहवरील एका नव्या मालिकेचा प्रोमो पाहून ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिका बंद तर होणार नाही ना? असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. स्टार प्रवाहने अलीकडेच ‘विसरु नको तू मला’ या मालिकेची घोषणा केली. ही मालिका 29 जून पासून संध्याकाळी सात वाजता सुरू होणार असल्याचं सांगितलं. पण या वेळेत मृणाल दुसानीस आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांची ‘लग्नानंतर होईलच प्रेम ‘ ही मालिका प्रसारित होते. त्यामुळे आता त्याच वेळेत नवी मालिका सुरू होत असल्याने ही मालिका संपणार का ?असा प्रश्न चहात्यांच्या मनात निर्माण झालाय.स्टार प्रवाह वाहिनीने लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. 

स्टार प्रवाहने नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करताच चाहत्यांना ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिका संपणार की काय असा प्रश्न पडलाय. टीआरपीच्या आधारे स्टार प्रवाहने सात वाजताचा स्लॉट हा ‘विसरु नको तू मला’ या मालिकेला दिला आहे. परंतु, 7:00 वाजता ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेची वेळ होती. त्यामुळे आता मालिकेची वेळ बदलणार की, ही मालिका संपणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहे.

सध्या मालिकेत सुरू असलेला ट्रॅक पाहता अनेक जण ही मालिका लवकरच संपणार असल्याचा अंदाज लावत आहेत.  अनेकांनी ही मालिका आता दुपारच्या सत्रात सुरु होईल, असाही अंदाज व्यक्त केलाय. स्टार प्रवाहने मालिकेची वेळ बदलल्याची चर्चा आहे. अद्याप, स्टार प्रवाह वाहिनीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.  त्यामुळे स्टार प्रवाहने अपडेट दिल्यानंतरच ‘लग्नानंतर होईलच प्रेम ‘ मालिकेविषयी असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मिळणार आहे. दरम्यान,  ‘विसरु नको तू मला’ या मालिकेत लोकप्रिय अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि अभिनेत्री तन्वी मुंडले ही जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *