Surya Gochar 2026 : सूर्याच्या संक्रमणाने ‘या’ राशींचा सुरु होणार भाग्योदय; 16 जुलैपासून जगतील राजासारखं आयुष्य, हातात खेळेल पैसा


Surya Gochar 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, उद्या म्हणजेच 16 जुलै 2026 रोजी ग्रहांचा राजा सूर्य देव (Surya Gochar) मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्यदेवाला मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा आणि आत्मविश्वासाचा कारक ग्रह म्हणतात. जेव्हा सूर्य कर्क राशीत येतो तेव्हा हा काळ फार अनुकूल असतो. त्यामुळे हा कालावधी कोणकोणत्या राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

या राशीच्या तिसऱ्या चरणात सूर्याचं संक्रमण होणार आहे. हा काळ तुमच्यासाठी भरभराटीचा असणार आहे. तसेच, तुम्हाला तुमच्या कामातून चांगले परिणाम मिळतील. धार्मिक यात्रेला देखील तुम्ही जाऊ शकता. नवीन गोष्टी शिकू शकता. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

या राशीच्या अकराव्या चरणात सूर्य ग्रह आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला धनलाभाचे योग जुळून येतील. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. समाजातील काही प्रभावी लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील. तुमचं नेटवर्किंग चांगलं असेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

या राशीच्या दहाव्या चरणात सूर्यदेव आहे. त्यामुळे करिअरच्या बाबतीत तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. नोकरीत तुमच्या पदोन्नतीत चांगली वाढ झालेली दिसेल. गरजू लोकांची तुम्ही मदत कराल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

या राशी सहाव्या चरणात सूर्यदेव संक्रमण करणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हा काळ फार आरामदायी असणार आहे. या काळात तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करा. सरकारी योजनांचा लाभ तुम्ही घ्याल. तसेच, या कालावधीत तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. 

‘या’ राशींना चांगले परिणाम मिळू शकतात 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ फार भाग्यशाली असणार आहे. तुमचे परदेशाशी संबंधित कामे वेळेत पूर्ण करता येतील. भविष्यासाठी तुम्ही चांगल्या योजना राबवू शकता. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

या काळात तुमच्या योजना अधिक मजबूत होतील. कुटुंबियांबरोबर तुमचा काळ चांगला जाणार आहे. तसेच, मित्र-परिवाराची साथ लाभेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

या राशीच्या पहिल्या चरणात सूर्यदेव विराजमान आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. अहंकार कमी करा. तसेच, तुमच्या हिताच्या गोष्टी करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Shukra Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या 24 तासांत 4 राशींचं भाग्य उजळणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने बॅंक बॅलेन्स वाढणार, करिअरलाही मिळणार नवी दिशा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *