Jayant Patil: अर्थमंत्री होणार का? जयंत पाटलांनी दिलं एका वाक्यात उत्तर; राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा – Marathi News | Will Jayant Patil Become Maharashtra Finance Minister His One Line Reply Sparks Political Buzz


सध्या राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजल्याचे दिसत आहे. काल मध्यरात्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्याचवेळी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे देखील वर्षा बंगल्यावर उपस्थित होते. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. जयंत पाटील यांना अर्थमंत्री पद देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अर्थमंत्री पदाविषयी ते काय म्हणाले?

अर्थमंत्री पदाविषयी बोलताना जयंत पाटील म्हणाले, मी कशाचाच विचार केला नाही. तुम्ही माझ्यापेक्षा पुढचा वाटप का करतात? खाते वाटप हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. तोही तुम्ही हिरावून घेत आहात. तो त्यांचा अधिकार आहे. माणूस गेला तर होईल ना. आम्ही शरद पवार यांच्यासोबत एकसंघ आहोत. वारंवार प्रसार माध्यमातून अशा चर्चा का होत आहे. याचं दु:ख होतं.

पुढे ते म्हणाले, तो विषय महसूलमंत्र्यांच्या अख्त्यारीत येत नाही. नगरपालिकेचा विषय आहे. तो नगरविकास खात्याकडेच आहे. आम्ही शिंदेंना भेटण्याचा प्रयत्न केला. त्यांचा फोन बंद होता. दिल्लीला गेल्याचं कळलं. नगराध्यक्षच माझ्यासोबत येणार होते. पण शिंदे भेटणार नाही हे कळल्यावर मी नगराध्यक्षांना जायला सांगितलं. त्यानंतर मी सीएमला भेटलो.

डीलिमिटेशनवरही जयंत पाटीलांची प्रतिक्रिया

शेवटी जयंत पाटील यांनी डीलिमिटेशनवर देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आमचे आठ खासदार एकत्र आहेत. सुप्रिया सुळे त्यांचं नेतृत्व करतात. सुप्रिया सुळेंवर जबाबदारी आहे. डीलिमिटेशन बिल आणि वन नेशनचं बिल. आदी मुद्द्यावर सुप्रिया सुळे धोरण ठरवतील. महिलांच्या आरक्षणावर त्या नेहमी आग्रही राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या स्तरावर निर्णय होईल. बिल संसदेत येणार आहे. मी विधानसभेत आहे. त्यामुळे मी त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. पक्षाची भूमिका आमच्या कार्याध्यक्षा ठरवतील. त्यांच्या अधिकारात मी हस्तक्षेप करू शकत नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *