Success Story : कचरा गोळा करून पोट भरावं लागायचं, आज त्याच कुटुंबाचा लेक बनला न्यायालयाचा मानकरी; रवि घुलेने रचला इतिहास | मुंबई बातम्या (Mumbai News)


Last Updated:

Kalyan Inspiring Story: कल्याणच्या डंपिंग ग्राऊंड परिसरातील साठे नगर वस्तीत राहणाऱ्या रवि घुले याने सर्व अडचणींवर मात करत वकिलीची पदवी मिळवली आहे. कचरा वेचणाऱ्या कुटुंबातील या तरुणाने जिद्दीच्या जोरावर मिळवलेले हे ऐतिहासिक यश सध्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठी प्रेरणा ठरत आहे.

कल्याणच्या रविने जिद्दीच्या जोरावर पलटवलं स्वतःचं नशीब
कल्याणच्या रविने जिद्दीच्या जोरावर पलटवलं स्वतःचं नशीब

कल्याण : खरं तर आजूबाजूच्या परिस्थितीपेक्षा मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस अत्यंत कमी जण करतात. ज्यात अनेक अडथळे, संघर्ष आणि काही मर्यादा असताना देखील काहीजण स्वत:चा मार्ग तयार करतात. सध्या अशाच एका तरुणाने कठोर मेहनत, जिद्द आणि शिक्षणाच्या जोरावर स्वत: चे संपूर्ण आयुष बदलले आहे.

रवि घुलेचा थक्क करणारा प्रवास

कल्याण शहरातील डंपिंग ग्राउंडजवळ असलेल्या एका साठे नगर वस्तीत लहानाचा मोठा झालेल्या रवि घुले या तरुणाने अखेर संघर्षावर मात करत मोठे यश प्राप्त केले आहे. चक्क कचरा वेचणाऱ्या कुटुंबातील या तरुणाने आता कायद्याचे शिक्षण पूर्ण करुन वकिल होण्याचा मान मिळवला. आता त्याच्या नावापुढे अॅडव्होकेट ही पदवी जोडली गेली असून त्याची हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

‘अनुबंध’ संस्थेचे मोठे योगदान

खरं तर या साठे नगर वस्तीतीत राहत असलेल्या प्रत्येक कुटुंबाचे जीवन हे डंपिंग ग्राउंडभोवती फिरत होते. दररोज फक्त कचरा गोळा करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह हा इथं राहत असलेले करत होते. याच परिस्थितीत मुलांना चांगल्या शिक्षणाची संधी मिळणे ही एक खूप मोठी गोष्ट होती. अशात साधारण 22 ते 20 वर्षांपूर्वी एका अनुबंध संस्थेने या भागात राहत असलेल्या काही मुलांना शिक्षण देणे त्यांनी ठरवले.

त्यानुसार संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्या वस्तीत जाऊन पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर अनेक अडचणींवर मात करत मुलांना शाळेत दाखल करण्याचे काम एक सुरु झाले. त्याच दिवसात रवि घुले या मुलानेही चांगले शिक्षण करण्याचे ठरवले. विशेष म्हणजे रवि हा त्यांच्या कुटुंबातील आणि वस्तीतील पहिला मुलगा आहे ज्याने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. रविला दहावीच्या परिक्षेतही चांगले गुण मिळाले होते. त्यानंतर वस्तीतील इतर मुलांना चांगले शिक्षण आपण घ्यावे अशी प्रेरणा मिळाली. त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेणे ठरवले.

महत्त्वाचे म्हणजे अनुबंध या संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या प्रा.मीनल सोहन यांनी रविच्या शिक्षणाच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी रविला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन आणि पाठींबा दिल्याने त्याने हे पुढील शिक्षण पूर्ण केले आणि त्याला शक्यही झाले.

मराठी बातम्या/मुंबई/

Success Story : कचरा गोळा करून पोट भरावं लागायचं, आज त्याच कुटुंबाचा लेक बनला न्यायालयाचा मानकरी; रवि घुलेने रचला इतिहास



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *