Ketan Murder Case: डोकं सुन्न… अरे तो वाचला असता…जीवघेण्या लफड्याची सियाच्या घराच्यांना होती माहिती? केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठा खुलासा – Marathi News | Ketan Agarwal Murder Case update Did Siya Goyal family know about the fatal affair Major revelation in the Ketan Agarwal murder case


केतन अग्रवाल, रिया गोयल, चेतन चौधरीImage Credit source: एजन्सी

Ketan Agarwal Murder Case: ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरून व्यावसायिक केतन अग्रवाल (26) हत्याकांडात पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्व बाजूने तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा गुंता सोडवण्याचा जसजसा प्रयत्न होत आहे, तशी अजून धक्कादायक माहिती समोर येत आहे. या खून प्रकरणात सिया गोयल (20) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (22) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचे अनेक पदर उलगडत आहे. दोन-तीन मुद्दे असे समोर आले आहेत की वेळीच जर केतन आणि त्याच्या कुटुंबियांना माहिती झाली असती तर हा तरुण वाचू शकला असता. तर दुसरीकडे सियाच्या कुटुंबियावर जनमाणसात मोठा रोष व्यक्त होत आहे. या कुटुंबाविषयी अजून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. गोयल कुटुंबियांनी मुलीला वेळीच आवरले असते तर पुढील दुर्दैवी घटना घडलीच नसती. सियाच्या कुटुंबियांना तिच्या याकाळ्या कांडाची कल्पना अगोदरच आल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यांनी वेळीच पाऊल टाकलं असतं तर कदाचित हा उमदा तरूण वाचला असता, असा दावा करण्यात येत आहे.

पोलिसांचा मोठा खुलासा, सियाच्या कुटुंबियांना प्रेमप्रकरणाची माहिती

याप्रकरणात पोलीस सूत्रांच्या माध्यमातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. केतन अग्रवाल याच्याशी साखरपुडा होण्यापूर्वीपासून सिया आणि चेतन चौधरी यांचे एकमेकांशी प्रेमसंबंध होते. सियाच्या कुटुंबियांना या प्रेमसंबंधाची पूर्ण कल्पना होती. गोयल कुटुंबियाचा या नात्याला विरोध होता. चेतन हा मुलीसाठी योग्य जोडीदार नसल्याचे गोयल कुटुंबियांचे मत होते. त्यामुळे त्यांनी केतनसाठी तिचे मन वळवले. पण तिच्या मनात जणू या निर्णयाने सुडाग्नी पेटला. तिने त्याचवेळी केतनचा काटा काढण्याचा निर्धार पक्का केला.

केतनला जीवनातून कायमचे बाद करण्यासाठी आणि चेतनसोबत जीवन व्यतीत करण्यासाठी तिने एक निर्दयी निर्णय घेतला. तिला या निर्णयाच्या परिणामांची माहिती होतीच. पण चेतनवरील प्रेम आणि घरच्यांच्या निर्णयाचा बदला घेण्यासाठी तिने हे पाऊल टाकल्याचे मानले जात आहे. पोलिसांनी आतापर्यंत या खून प्रकरणात सियाच्या कुटुंबियांची अथवा इतर नातेवाईकाचा सहभाग होता असे म्हटलेले नाही. त्यांचा तपास सुरू आहे.

आम्ही लग्नाला नकार दिला होता, पण त्यांनी गळ घातली

आपल्या मुलाची इतकी निर्घृण हत्या होईल असे कधीही अनिल अग्रवाल यांना वाटले नाही. त्यांनी एक मोठा खुसाला केला. सुरुवातीला जेव्हा गोयल कुटुंबियाकडून लग्नाचा प्रस्ताव आला, तेव्हा तो अग्रवाल कुटुंबाने नाकारला होता. केतन अजूनही लग्नासाठी तयार नसल्याचे त्यांचे मत होते. तर सियाचे वयही केतनपेक्षा खूप लहान होते. त्यामुळे अग्रवाल कुटुंबिय या लग्नासाठी तयार नव्हते. गोयल कुटुंबियांची 35-40 वर्षांपासून ओळख होती. त्यामुळे त्यांनी खूप आग्रह धरला. जुनी मैत्री, जुनं नातं याचा विचार करून मग आम्ही लग्नाला होकार दिला. पण आमच्या एका निर्णयाचे इतके घातक परिणाम होतील याचा कधी स्वप्नातही विचार केला नसल्याचे अनिल अग्रवाल म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *