Spruha Joshi on Trolling: हॉल्टरनेक ब्लाऊजमुळे 10 वर्षांपूर्वी ट्रोल झाली; स्पृहा जोशीनं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर , स्पष्टच म्हणाली..


Spruha Joshi on Trolling: मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशी कायमच तिची वाणी, बोलण्याची पद्धत आणि अभिनयासाठी ओळखली जाते. नाटक, मालिका, चित्रपट अशा सगळ्या प्रकारांमधून स्पृहाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. शिवाय संकर्षण via स्पृहा हा तिच्या आणि संकर्षणच्या कवितांचा कार्यक्रमही चर्चेत असतो. सोशल मीडियावर स्पृहा अनेकदा तिच्या आयुष्यातील अपडेट्स, तिचे लूक शेअर करत असते. पण काही वर्षांपूर्वी स्पृहाला तिच्या एका हॉल्टरनेक डिझाईनच्या ब्लाऊजमुळे खूप ट्रोल केलं होतं. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमुळे स्पृहा सोशल मीडियावर होणाऱ्या नकारात्मक गोष्टींवर, ट्रोलिंगवर स्पष्ट शब्दात ती बोललीय. 

अभिनेत्री स्पृहा जोशीने अलीकडेच ‘अमुक तमुक ‘ ला दिलेल्या मुलाखतीत त्या ट्रोलिंगविषयी सांगितलं. हॉल्टरनेक डिझाईनच्या ब्लाऊजमुळे मला इतका ट्रोल केलं होतं की, त्याची बातमीही वर्तमानपत्रात छापून आलेली. गंमत म्हणजे, त्या फोटोत आक्षेपार्ह असं काहीच नव्हतं तरीही लोकांनी टीका केली. असं स्पृहा म्हणाली.

काय म्हणाली स्पृहा जोशी?

 ‘मी 10 वर्षांपूर्वी हॉल्टर नेक ब्लाउज परिधान केलेला फोटो पोस्ट केला होता. तो फोटो बघून लोकांनी मला ट्रोल केलं. इतकं की, त्याची वर्तमानपत्रात बातमी छापून आली आणि त्या फोटोमध्ये काहीच नव्हतं. गंमत अशी की, काही असतं आणि ट्रोलिंग झालं असतं तर मी समजू शकले असते. पण, काहीच नव्हतं त्यात. त्यावरून ट्रोल झाले.’

‘एक मासा खाताना आणि खेकडा खातानाचा फोटो टाकला, त्यावरून ट्रोल झाले. मी एकाही निगेटिव्ह कमेंटला उत्तर देत नाही. कारण, मला असं वाटतं की, मी माझी शक्ती किती खर्च करू? ट्रोलिंगचं प्रमाण इतकं वाढलंय की, ट्रोल करणाऱ्याची कमेंट मी हाईड करते किंवा त्या व्यक्तीला ब्लॉक करते. माझे फॉलोअर्स किती आहेत, याने मला फरक नाही पडत. छान बोलायचं असेल तर वेलकम. घाणेरडं बोलायचं असेल तर नका येऊ.

‘तो अधिकार फक्त माझ्या घरच्यांना.. ‘

‘अनोळखी लोकांनी मला मी काय खायचं, काय कपडे घालायचे हे सांगितलेलं आवडत नाही. कपड्यांवरुन लोकांना बोलणं, हे असंच पाहिजे, तसंच पाहिजे. हे काय तुम्ही घातलंय हे बोलणं मला आवडत नाही. हा अधिकार मी फक्त माझ्या घरच्यांना दिलेला आहे. हे मला अजिबात अवडत नाही.’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *