Vaibhav Sooryavanshi: वैभवला IND vs ENG 5th T20 मध्ये स्थान दिलं का नाही दिलं? कर्णधार श्रेयस अय्यरचं न पटणार उत्तर – Marathi News | Shreyas iyer statement why vaibhav sooryavanshi out of playing xi


भारतीय संघाने साउथम्पटन येथे पार पडलेल्या शेवटच्या आणि पाचव्या सामन्यात एक मोठा निर्णय घेतला. भारतीय संघ तीन सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरलेल्या 15 वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशीला संघातून वगळले आणि त्याच्या जागी अनुभवी संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. याचा तसा विशेष काही फायदा झाला नाही. संजूलाही फक्त 27 धावा करता आल्या. भारतीय संघाने मालिका 4-0 ने गमावली. पण कर्णधार श्रेयस अय्यरने शेवटच्या आणि पाचव्या सामन्यात वैभवला संधी न देण्यामागचे कारण देताना काय म्हणाला ते पाहा..

नाणेफेकीच्या वेळी कर्णधार श्रेयस अय्यरने स्पष्ट केले की, “वैभवला वगळण्याचा निर्णय कोणत्याही दुखापतीमुळे किंवा तंदुरुस्तीच्या समस्येमुळे नसून, तो एक धोरणात्मक निर्णय आहे. संघाचे भविष्य लक्षात घेऊन सर्वोत्तम संघ संयोजन शोधण्याची हीच योग्य वेळ आहे असे त्याला वाटले आणि त्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला. ”

रोझ बाऊल येथे खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात भारताला 56 धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. यासह, यजमान इंग्लंडने मालिका 4-0 ने जिंकली आहे. दोन्ही देशांमधील मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. इंग्लंडने पुढचा सामना 4 गडी राखून जिंकला आणि तिसऱ्या सामन्यात भारताला 125 धावांनी पराभूत केले. मालिकेतील चौथा सामना 9 गडी राखून गमावल्याने भारताने मालिका गमावली. अंतिम सामना जिंकून खाते उघडण्याची भारतीय संघाला संधी होती, पण त्यातही ते अपयशी ठरले. कर्णत्रार श्रेयस अय्यरकडे एक चांगली संधी होती स्वत:ला कॅप्टन म्हणून सिद्ध करण्याची पण त्याच्याकडून ते झाले नाही. श्रेयस अय्यरने या मालिकेत चांगल्या धावा केल्या पण एकही सामना जिंकता आलेला नाही. सहा टी-20 मध्ये भारतीय संघाला त्याला एकदी विजय मिळवून देता आलेला नाही.

आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहेत. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्त्व शुभमन गिल करणार आहे. टी-20 संघातील काही खेळाडू वनडे संघात पण असतील. आता वनडे मालिका तरी संघाला जिंकायला जमते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *