Shravan 2026: अधिक मासनंतर ‘श्रावण मास’ अत्यंत पॉवरफुल! दुर्मिळ गुरू-पुष्य राजयोग, 5 राशींची भरभराट, शिव-विष्णूंची डबल कृपा, तिथी, महत्त्व…


Shravan 2026: सध्या अधिक मास सुरू आहे, आणि तो 15 जून रोजी संपतोय. त्यानंतर आता उत्सुकता आहे, ती म्हणजे श्रावण महिन्याची… कारण महिना देखील लवकरच सुरू होत आहे. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो. हा महिना भगवान शिवाला समर्पित असून, या काळात शिवपूजा, उपवास, जप-तप आणि धार्मिक अनुष्ठानांना विशेष महत्त्व असते. ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी श्रावण 2026 खूप विशेष असणार आहे, कारण गुरु ग्रह पुष्य नक्षत्रात विराजमान होऊन एक दुर्मिळ योग तयार करत आहे. ज्योतिषींच्या मते, हा योग 5 राशींना धन, प्रगती आणि शुभ वार्ता देऊ शकतो.

श्रावण महिना कधी सुरू होतोय? दुर्मिळ गुरू-पुष्य राजयोग…(Shravan 2026)

वैदिक पंचांगानुसार, यंदा श्रावण महिना हा 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत असेल. ज्योतिषींच्या मते या महिन्यात एक दुर्मिळ गुरु-पुष्य योग तयार होत आहे. सध्या गुरुने कर्क राशीत प्रवेश केला असून, तो आता 18 जून 2026 रोजी गुरु-पुष्य नक्षत्रात प्रवेश करेल आणि 19 ऑगस्ट पर्यंत तेथेच राहील. गुरुचा अत्यंत शुभ पुष्य नक्षत्रातील मुक्काम अत्यंत शुभ फळे देईल. भगवान शिवाच्या आशीर्वादाने या महिन्यात होणारी ही दुर्मिळ गुरू युती 5 राशींचे भाग्य उजळवेल. जेव्हा श्रावणाची पवित्र ऊर्जा, गुरूची कृपा आणि पुष्य नक्षत्राचा प्रभाव एकत्र येतो, तेव्हा तो धर्म, कर्म आणि भाग्याचा संगम मानला जातो.

श्रावण आणि गुरु कृपेचा दुर्मिळ संयोग

धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे. शिव आणि गुरु दोघेही आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक आहेत, त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर 2026 मध्ये नामजप, तपस्या, ध्यान, रुद्राभिषेक, दान आणि सेवा फलदायी ठरू शकतात. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, जे लोक बऱ्याच काळापासून संघर्ष करत आहेत आणि आपल्या कष्टाचे फळ मिळवू इच्छितात, त्यांच्यासाठी हा काळ विशेष असू शकतो. 18 जून 2026 पासून, पुष्य नक्षत्रावरील गुरूचा प्रभाव अधिक दृढ होऊ लागेल. 1 जुलै ते 18 ऑगस्ट 2026 या काळात याचा प्रभाव सर्वाधिक सक्रिय राहण्याची अपेक्षा आहे. हा काळ करिअर, संपत्ती, विवाह, संतती, शिक्षण, मालमत्ता आणि आध्यात्मिक प्रगतीशी संबंधित बाबींमध्ये विशेष परिणाम देणारा मानला जाईल.

5 राशींना सर्वाधिक लाभ!

मेष (Aries)

ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा श्रावण महिना मेष राशीच्या लोकांना धन, वाहन आणि कौटुंबिक सुखात वाढ दिसून येऊ शकते.

मिथुन (Gemini)

ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा श्रावण महिना मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक बळकटी आणि उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे दिसू शकतात.

कर्क (Cancer)

ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क ही गुरूची राशी आहे. त्यामुळे, यंदा श्रावण महिना या राशीला सर्वाधिक लाभ होऊ शकतो. कर्क राशीच्या लोकांना जीवनात नवीन दिशा आणि मोठ्या संधी मिळू शकतात.

तूळ (Libra)

ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा श्रावण महिना तूळ राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

मीन (Pisces)

मीन राशीच्या लोकांना प्रेम, संतती आणि सर्जनशील कार्यात यश मिळू शकते.

श्रावणात ‘हे’ उपाय करा…

  • गुरुवारी पिवळे कपडे घाला.
  • भगवान शिवाला पाणी, बेलपत्र आणि कच्चे दूध अर्पण करा.
  • भगवान विष्णूसमोर तुपाचा दिवा लावा.
  • “ॐ ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरवे नमः” या गुरुमंत्राचा 108 वेळा जप करा.
  • गरजूंना पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा…

हेही वाचा

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींच्या श्रीमंतीचा हाच योग! जूनचा तिसरा आठवडा पॉवरफुल, साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *