Most Valuable Celebrity List: ना रणवीर सिंह, ना प्रियंका चोप्रा… 37 वर्षांचा ‘हा’ क्रिकेटर बनला भारताचा सर्वात महागडा सेलिब्रिटी, ओळखलं का कोण?


Most Valuable Celebrity List: तुम्हाला विचारलं की, भारतातला सर्वात महाग सेलिब्रिटी (India’s Most Expensive Celebrity) कोण? तर, तुम्ही रणवीर सिंह (Ranveer Singh), दीपिका पादुकोन, आलिया भट (Alia Bhatt), प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra), रणबीर कपूर (Ranbir Kapoor), सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान (Shah Rukh Khan)… अशी एक नाहीतर अनेक नावं घ्याल. पण, तुम्हाला माहितीय का? भारतातील सर्वाधिक ‘ब्रँड व्हॅल्यू’ (Brand Value) असलेला सेलिब्रिटी सिनेसृष्टीतला नाहीच मुळी, तो आहे क्रिकेटच्या मैदानातला. आम्ही ज्या, सर्वाधिक ‘ब्रँड व्हॅल्यू’ असलेल्या सेलिब्रिटीबाबत बोलतोय, त्याचं नाव आहे, टीम इंडियाची ‘रन मशीन’ विराट कोहली. 

भारतीय क्रिकेटपटू आणि सुपरस्टार विराट कोहली (Indian Cricketer Virat Kohli) पुन्हा एकदा चर्चेत आलाय. आयपीएलमध्ये (IPL) आरसीबीला (RCB) सलग दुसऱ्यांदा विजयाकडे नेल्यानंतर, कोहलीनं आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केलीय. तो भारतातील सर्वाधिक ‘ब्रँड व्हॅल्यू’ (Brand Value) असलेला सेलिब्रिटी बनलाय. या कामगिरीद्वारे त्यानं रणवीर सिंह, प्रियांका चोप्रा, शाहरुख खान, एम. एस. धोनी (M. S. Dhoni), अक्षय कुमार (Akshay Kumar), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), आलिया भट आणि अल्लू अर्जुन (Allu Arjun) यांसारख्या दिग्गजांना मागे टाकलंय. सध्या भारतात विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू सर्वाधिक (Virat Kohli Highest Brand Value In India) आहे. 

विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू (Virat Kohli Brand Value)

‘फॉर्च्युन इंडिया’ (Fortune India) आणि ‘इंटरब्रँड’ (Interbrand) यांनी नुकतीच ‘मोस्ट व्हॅल्यूएबल सेलिब्रिटी’ (Most Valuable Celebrities) यादी जाहीर केलीय. जागतिक ब्रँड कन्सल्टन्सी असलेल्या ‘इंटरब्रँड’च्या सहकार्यानं ‘फॉर्च्युन इंडिया’नं तयार केलेल्या या यादीत, 3,542 कोटी रुपयांच्या ब्रँड व्हॅल्यूसह विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे आणि तो या वर्षातील भारतातील ‘मोस्ट व्हॅल्यूएबल सेलिब्रिटी’ ठरलाय. कोहली पहिल्या स्थानावर असताना, या यादीतील उर्वरित पहिल्या 10 जणांमध्ये शाहरुख खान दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर प्रियांका चोप्रा जोनास (तिसऱ्या स्थानी), एम.एस. धोनी (चौथ्या स्थानावर), रणवीर सिंह (पाचव्या क्रमांकावर), अक्षय कुमार (सहावा), अमिताभ बच्चन (सातवे), सचिन तेंडुलकर (आठवा), आलिया भट्ट (नववी) आणि अल्लू अर्जुन (दहावा) यांचा क्रमांक लागतो.

टॉप 10 सेलिब्रिटींच्या यादीत कोण-कोण? (Top 10 Celebrites)

‘मोस्ट व्हॅल्यूएबल सेलिब्रिटी’ या यादीनुसार, विराट कोहलीची  ब्रँड व्हॅल्यू 3,542 कोटी आहे, तर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची ब्रँड व्हॅल्यू 3,017 कोटी, जागतिक स्तरावरील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व प्रियांका चोप्रा जोनासची 2,507 कोटी, एम.एस. धोनीचं 2,141 कोटी, रणवीर सिंहचं 2,077 कोटी, अक्षय कुमारचं 2,064 कोटी, अमिताभ बच्चनचं 1,933 कोटी, आलिया भट्टचे 1,606 कोटी आणि अल्लू अर्जुनचे ब्रँड मूल्य 1,522 कोटी इतकं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mahesh Tilekar On Ajit Pawar: ‘अजित पवारांनी अनेक कलाकारांना मदत केलीय, पण कोणीच उल्लेख करत नाही…’; पाणावलेल्या डोळ्यांनी ज्येष्ठ दिग्दर्शकानं व्यक्त केलीय खंत

ABP Majha च्या बातम्या LIVE: 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *