Shivsena : ‘दुसरीकडे गेल्यावर ती वेश्या हे असं बोलणं म्हणजे..’ राज ठाकरेंचे शब्द शिंदे सेनेच्या मनाला लागले, लगेच पलटवार – Marathi News | From Eknath Shinde Shivsena Sanjay Shirsat hit back to mns chief raj Thackeray


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेतली. निवडणूक आयोगाकडून मतदार यादीबद्दल जे सरचं काम सुरु झाला आहे. त्यासह खासदार, आमदार फुटीवर राज ठाकरे यांनी परखड शब्दात भाष्य केलं. राज ठाकरे जे बोलले ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पटलेलं नाही. राज ठाकरेंचे शब्द जिव्हारी लागले. त्यावर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे. राज ठाकरे काल म्हणाले की, “प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीय, विकले जाणाऱ्यांचा आहे. देहविक्रीला समजा हे तयारच असतील, तर गिऱ्हाईक आहेतच. जे राजकारण चालू आहे ते खूप घाणेरडं आहे” त्याला उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले की, ‘राज ठाकरे यांनी काल कोणत्या आधारावर वक्तव्य केलं ते कळायला अर्थ नाही’

“तुमच्या पक्षात असेल तर वाघ आणि दुसरीकडे गेल्यावर ती वेश्या असं स्टेटमेंट करणं गैर आहे. पक्षांतर्गत मतभेद नाहीत का? तुमचं सर्व सहन कराव असा करार केलेला आहे का? पक्ष श्रेष्ठी वेळ देत नाहीत, दबूनच राहायचं काय? तुम्ही गद्दार , खोके घेतले म्हणतात. मात्र तुम्ही तुमच्याकडे कार्यकर्ते ठेवण्यात अपयशी ठरलात. भाजपची भूमिका काय येत्या काळात ठरेल” असं उत्तर संजय शिरसाट यांनी दिलं.

रोहित पवार पेक्षा अमोल कोल्हेंचे मत महत्वाचे

अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांच्या परस्पर विधानांवर संजय शिरसाट बोलले. “अमोल कोल्हे हे नेता आहेत, प्रवक्ते आहेत निश्चितच त्याला कुणीतरी सांगितले असेल. याचा अर्थ त्याला पक्षाच्या नेतृत्वाने सांगितले असेल. रोहित बोलतो ते पवारांचे मत असते. उलटी भूमिका घेणं हे पवारांचं नेहमीचच आहे. ऑफर आली तर जायचे हे ठरलेले आहे. रोहित पवार पेक्षा अमोल कोल्हेंचे मत महत्वाचे. बदलाचे वारे जेव्हा वाहतात तेव्हा अशा प्रकारे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली जातात” असं संजय शिरसाट म्हणाले. उद्धव ठाकरे यांना आम्ही कधीही म्हटलेलं नाही की, तुम्ही एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारा असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *