Last Updated:
Pune Police permission to conduct polygraph test : सिया गोयल हिची ‘लाय-डिटेक्टर’ चाचणी करण्याची परवानगी मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात धाव घेतल्याची माहिती मिळाली आहे.
Pune Police Ask court permission : केतन अग्रवाल हत्या प्रकरणी तपासाला आता वेग आला आहे. सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी अटकेत आहेत. न्यायालयाने सिया गोयल आणि चेतन चौधरीला 3 जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, उद्या सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार आहे. अशातच पोलिसांच्या हातात काहीत तास शिल्लक असताना आता पुणे पोलिसांनी तातडीने कोर्टात धाव घेतली आहे. पुणे पोलिसांना अद्याप काही प्रश्नांची उत्तर मिळाली नाहीत. त्यामुळे पुणे पोलीस शेवटचा पर्याय वापरण्याचा विचार करत आहेत.
‘लाय-डिटेक्टर’ चाचणी करण्याची परवानगी
केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मुख्य संशयित असलेली त्याची फियॉन्से सिया गोयल हिची ‘लाय-डिटेक्टर’ चाचणी करण्याची परवानगी मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात धाव घेतली. केतनला दरीत कोणी ढकलले, हे सिद्ध करणारा कोणताही प्रत्यक्षदर्शी किंवा ठोस पुरावा उपलब्ध नाही; केवळ आरोपीच्या जबाबांशिवाय अन्य काहीही हाती लागले नाही, असे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले.
ज्या ज्या ठिकाणी सियाची उपस्थिती होती, तिथं तिथं पोलीस तपास करत आहेत. पुण्यातील कोंढवा भागात असलेल्या ‘लीलाकुंज’ या निवासस्थानी पोलीस सियाला घेऊन पोहोचले होते. तिथं त्यांनी पंचनामा केला. केतनच्या हत्येनंतर सियाने घरी येऊन काय केलं. सियाचे कपडे देखील पोलिसांनी जप्त केले. त्यावेळी सियाचे घरचे देखील तिथंच उपस्थित होते. पोलीस सियाच्या घरी साधारणपणे एक तास थांबले. त्यानंतर पोलीस सियाला घेऊन इतर ठिकाणी पंचनामासाठी घेऊन गेले.
Pune,Maharashtra
