Shani Nakshatra Parivartan 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता आणि न्यायदेवता शनिदेव (Shani Dev) लवकरच मोठं नक्षत्र परिवर्तन करणार आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला शनि रेवती नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे. रेवती नक्षत्राचा स्वामी ग्रह बुध आहे. शनिचं हे संक्रमण सर्वात प्रभावशाली असणार आहे. शनिच्या नक्षत्राचा सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. मात्र, यातील 3 राशी भाग्यशाली ठरतील. या कालावधीत कोणत्या राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहेत ते जाणून घेऊयात.
ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनिदेव आता मीन राशीत आणि रेवती नक्षत्रात विराजमान आहे. 2 जुलै 2026 रोजी गुरुवारी सकाळी 8 वाजून 22 मिनिटांनी शनी रेवती नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे. तर, 20 ऑगस्ट 2026 रोजी याच स्थितीत शनि असणार आहे. याच संक्रमणाच्या दरम्यान 27 जुलै रोजी शनि वक्री चालसुद्धा चालणार आहे. त्यामुळे याचा प्रभाव अधिक वाढणार आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी शनिचं हे संक्रमण नवव्या चरणात होणार आहे. शनिची दृष्टी या राशीच्या लोकांसाठी लाभ आणि पराक्रमाची असणार आहे. या राशीच्या सहाव्या चरणात संक्रमण होणार आहे. तसेच, हा काळ तुमच्यासाठी शुभकारक असणार आहे. उत्पन्नाची नवी साधनं तुमच्यासमोर निर्माण होतील.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. शनिचं हे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी फार खास असणार आहे. तसेच, या राशीच्या सातव्या चरणात हे संक्रमण होणार आहे. त्यामुळे नोकरदार वर्गातील लोकाना करिअरमध्ये चांगला लाभ मिळेल. उत्पन्नाची नवी साधनं निर्माण होतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या दुसऱ्या चरणात शनिदेवाचं नक्षत्र परिवर्तन होणार आहे. या कालावधीत तुमच्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होईल. जर तुम्हाला नवीन घर किंवा प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी हा काळ शुभकारक असेल. तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. बॅंक बॅलेन्समध्ये वाढ होईल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी मेचा शेवटचा आठवडा कसा असणार? 6 पैकी 4 राशींना लागणार लॉटरी; साप्ताहिक राशीभविष्य
आणखी वाचा