Lagaan Bagha Fame Actor Statement: अमीर खानच्या ‘लगान’ने माझं करियर बरबाद केलं; 25 वर्षांनतर ‘बाघा’ फेम अभिनेता स्पष्टच बोलला..


Lagaan Bagha Fame Actor Statement: आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आणि अमीर खानची प्रमुख भूमिका असणारा ‘लगान’ चित्रपट (Lagaan) भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या  या चित्रपटाला यंदा 25 वर्षे पूर्ण होत आहेत. नुकताच मुंबईत चित्रपटाचा रौप्यमहोत्सवी सोहळा पार पडला. यानिमित्ताने ‘लगान’मध्ये ‘बाघा’ ही अविस्मरणीय भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अमीन हाजी (Amin Haji) यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.’लगान’मधील भूमिकेमुळे माझं  करियर बरबाद केलं’ असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. या वक्तव्याची सध्या एकच चर्चा आहे. 

काय म्हणाला अभिनेता?

‘लगान’ मध्ये बाघाची भूमिका करणारे अभिनेते अमीन हाजी यांनी अलीकडेच PTI ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं,”लगान’ने मला अभिनेता म्हणून इतकी समाधानकारक आणि उत्कृष्ट भूमिका दिली की त्यानंतर मिळालेलं कोणतंच काम मला तितकं चांगलं वाटलं नाही. ‘लगान’ची पटकथा इतकी ताकदीची होती की चित्रपटातील प्रत्येक कलाकार हा नायकच होता.”

ते पुढे म्हणाले “लगाननंतर मला ज्या भूमिका ऑफर झाल्या, त्या ‘लगान’च्या तोडीच्या नव्हत्या. त्यामुळे एका अर्थाने या चित्रपटाने मला व्यावसायिकदृष्ट्या उद्ध्वस्त केलं. या चित्रपटाने माझ्यासाठी दर्जाची पातळी इतकी उंचावली की तिथपर्यंत पुन्हा पोहोचणं खूप कठीण झालं.’

‘बाघा’ची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात 

‘लगान’मध्ये अमीन हाजी यांनी बाघा या मूकबधिर व्यक्तीची भूमिका साकारली होती. मंदिरात ढोल वाजवणारा बघा बोलू आणि ऐकू शकत नसला तरी त्याचं निरीक्षण विलक्षण असतं. पाऊस पडण्यापूर्वी त्याला त्याची चाहूल लागते. पुढे भुवनच्या क्रिकेट संघात तो एक महत्त्वाचा आणि कुशल फलंदाज ठरतो. या भूमिकेमुळे अमीन हाजी यांना विशेष ओळख मिळाली.

‘लगान’नंतर अमीन हाजी यांनी केवळ अभिनयच नाही तर लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम केलं. त्यांनी ‘कोई जाने ना’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. तसेच शाहरुख खानच्या ‘स्वदेस’ आणि हृतिक रोशनच्या ‘जोधा अकबर’ यांसारख्या चित्रपटांसाठी सहलेखक म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.

 ‘लगान’च्या सेटवरचं जुळली प्रेमाची गाठ 

‘लगान’च्या चित्रीकरणादरम्यान अमीन हाजी यांची ओळख ब्रिटिश सोशल अँथ्रोपॉलॉजिस्ट शार्लेट व्हिटबी-कोल्स यांच्याशी झाली. शार्लेट या चित्रपटाच्या टीमसोबत काम करत होत्या. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि नंतर दोघांनी विवाह केला.अलीकडेच ‘लगान’च्या 25 वर्षांच्या सोहळ्यात अमीन हाजी पत्नी आणि दोन मुलींसह सहभागी झाले होते. त्यांची कौटुंबिक छायाचित्रे सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झालेली.

 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *