Sanjay Jadhav : संजय जाधव यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ‘दुनियादारी’ सिनेमाच्या सिक्वलबद्दल सांगितलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – संजय जाधव यांचा ‘दुनियादारी’ हा सिनेमा प्रचंड गाजला. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाची चर्चा आजही होते. ‘दुनियादारी’च्या भरघोस यशानंतर या सिनेमाचा सिक्वल कधी येणार, याबद्दलची उत्सुकता चाहत्यांना होती. बऱ्याचदा ‘ दुनियादारी २ ‘ ची घोषणाही केली गेली. पण, सिनेमाच्या शूटिंगवेळी काही ना काही अडथळे आल्याचं संजय जाधव यांनी सांगितलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय जाधव यांनी ‘दुनियादारी २’बद्दल भाष्य केलं आहे.
‘दुनियादारी २’ येणार नाही
‘दुनियादारी २’ बद्दल बोलताना संजय जाधव म्हणाले की, ‘मी ठरवलंय, ‘दुनियादारी’ पुन्हा नाही करणार. माझ्याकडे स्क्रिप्ट आहे. मी ‘ये रे ये रे पैसा’चा सिक्वल केला, तो चालला नाही. पण ‘दुनियादारी’ने मला सगळं दिलंय. मी आज जो आहे तो फक्त त्या सिनेमामुळे आहे आणि मला त्याचा बिझनेस नाही करायचा. आता असं झालंय ना, तुम्ही काहीही करा, कितीही चांगला सिनेमा बनवा, लोक म्हणणार पहिल्याची मज्जा नाही. सोशल मीडियावर बोलणं खूप सोपं आहे. पण, त्यामागची मेहनत लोकांना कळत नाही. आणि हे मला झेपणार नाही.’ ‘आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण स्वातंत्र्य नव्हतं’ Milind Soman सोबतच्या ब्रेकअपबद्दल एक्स-गर्लफ्रेंड शहानाचं वक्तव्य ”दुनियादारी २’ हा प्रोजेक्ट ऑन होऊन इतका वेळा ऑफ झालाय…की मला वाटतं वरुन सुहास शिरवाळकर सांगत असतील की नको करू. तो एक सिग्नल पण घेतला पाहिजे आणि त्या गोष्टीचा आदरही केला पाहिजे. जेव्हाही सिनेमाचं शूटिंग करायचं म्हटलं, तेव्हा ते थांबलंय.’ असं संजय यांनी ‘मित्र म्हणे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं.
देऊळ बंद २ वेळी पायात बाभळीचा काटा रुतला, पाय बधिर झाला; मोहन जोशींनी किस्सा सांगितला
संजय जाधव पुढे म्हणाले की, ‘दुनियादारी हे माझं बाळ आहे. चांगलं वाईट जे काही आहे ते मी बनवलं आहे. आता माझ्यावर किंवा माझ्या स्क्रिप्टवर लोकांचा विश्वास नाही. सगळे हेच विचारतात की कास्टिंग तेच आहे ना? असं नका करू यार… त्या कलाकारांना न घेता मी काम करणारच नाहीये. पण तुम्ही माझ्याही कामाचा आदर करा. आणि जर तुम्हाला माझ्यावर विश्वास दाखवायचा नाही तर मग मला पण काम करायचं नाही.’
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा