![]()
आरसीबी हा सामना हरली आणि कोहलीचे योगदान केवळ 15 धावांचे होते ज्या दरम्यान त्याचा हेडसोबत वाद झाला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने चार गडी गमावून 255 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने विराट कोहली आणि व्यंकटेश अय्यर यांच्यासोबत डावाची सुरुवात केली. हैदराबादकडून शिवांग कुमार पहिले षटक टाकत होता. अय्यर त्याच्या चेंडूंवर निशाणा साधत होता, तर दुसरीकडे कोहली मिड-विकेटला क्षेत्ररक्षण करणाऱ्या हेडकडे वारंवार बोट दाखवून बोलत होता. या काळात तो बराच आक्रमक दिसत होता.
कोहली काय म्हणत होता हे स्पष्ट नसले तरी, त्याच्या बोलण्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या समालोचकांनी सांगितले की, कोहली हेडला म्हणत होता, “दम असेल तर मला तुझी थोडी ऑफ-स्पिन दाखव.” हेड फक्त हसत होता आणि कोहलीच्या बोलण्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हता. पाचव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कोहली बाद झाला. मात्र, तो बाद झाल्यानंतरही हा वाद शमला नाही. सामन्यानंतर, जेव्हा दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन करत होते, तेव्हा कोहलीने हेडशी हस्तांदोलन केले नाही.
सामना संपल्यानंतरही मैदानावरचा वाद सुरूच राहिला. सामना संपल्यावर, दोन्ही संघांतील खेळाडू हस्तांदोलन करत असताना, ट्रॅव्हिस हेडने खिलाडूवृत्ती दाखवत विराट कोहलीकडे हात पुढे केला. मात्र, कोहलीने हेडकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आपल्या समोर उभ्या असलेल्या खेळाडूशी हस्तांदोलन केले. इतकेच नाही, तर कोहलीने आपल्या अगदी मागे चालत असलेल्या इशान किशनला आपुलकीने अभिवादन केले, पण त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून तो पुढे निघून गेला. हैदराबाद सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्याकडे सध्या 18 गुण आहे तर आरसीबी सध्या गुणतालिकेत 18 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.