Sanjay Raut: आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरु होणार, लढाई आता लोकसभा, कोर्टात अन् रस्त्यावर चालेल; फुटीर खासदारांना संजय राऊतांचा गर्भित इशारा


Sanjay Raut: आमची लढाई आता लोकसभेत कोर्टात चालेल आणि रस्त्यावर चालेल, रस्त्यावरची लढाई सुरु झाली आहे. आता आम्ही ऑपरेशन तुडवा राबवणार आहोत, असा गर्भित इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. राऊत यांनी सांगितले की, आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरु होईल, ते गाxx लोकांनी बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी केल्याने माझी चीड असल्याचे राऊत म्हणाले. राऊत यांनी सांगितले की, तुम्ही ऑपरेशन टायगर म्हणत आहात, पण असे पळणारे टायगर कधी असतात का? आम्ही टायगर आहोत. आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरु होईल. राऊत यांनी गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेला सुद्धा प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले. गिरीश महाजन तुम्ही स्वतंत्र भोगताय ते काँग्रेसमुळे. ईडी आणि सीबीआय आमच्याकडे फक्त आणि पोलीस बाजूला करा आणि मग पाहा असा टोला राऊत यांनी लगावला. 

त्या खासदारांनी राजीनामा द्यावा 

फुटीर खासदारांवर राऊत यांनी चांगलाच हल्ला चढवला. फुटून गेलेले खासदार निवडणूक हरणार आहेत. त्या खासदारांनी राजीनामा द्यावा आणि निवडणूक लढवावी, आम्ही त्यांना गद्दार म्हणणार नाही, तुम्ही आमचे चिन्ह, आमच्या पैशावर निवडणूक जिंकलात, अशी टीका राऊत यांनी केली. या लोकांना आम्ही बेईमानी म्हणतो आणि बदमाशी म्हणतो. हे सगळे लोकं पैशाने विकत गेले आहेत. काल रात्री त्यांना 10 कोटी रुपये दिले, आतापर्यंत त्यांना 25 कोटी रुपये मिळाले आहेत, असा दावा राऊत यांनी केला. 

सशस्त्र पोलिसांची सिक्युरिटी देण्याचं कारण काय?

राऊत यांनी फुटीर खासदारांना दिलेल्या सुरक्षेवरूनही जोरदार टीका केली. ते म्हणाले, पोलिसांचा ताफा बाजूला ठेवून या. प्रत्येक गद्दाराला 40-40 सशस्त्र पोलिसांची सिक्युरिटी देण्याचं कारण काय? सिक्युरिटी काढा, तुमच्या अंगावरती चिंदी राहणार नाही. आव्हान द्यायचं असेल ना तर पोलीस बाजूला ठेवून या, तुमची फौज घेऊन या, आमची फौज आणतो, असा इशारा राऊत यांनी दिला. एक दिवस नाही, अर्धा तास जरी ईडी, सीबीआय आणि पोलीस माझ्याकडे आले, तर सगळ्यात आधी गिरीश महाजनला मी फोडून दाखवतो. गिरीश महाजन ही व्यक्ती पहिली फुटेल, असे राऊत म्हणाले. काँग्रेससोबत जाण्यावरून होणाऱ्या टीकेवर ते म्हणाले, काँग्रेस पक्षामुळे तुम्ही देशाचे स्वातंत्र्य भोगता. काँग्रेसने शेकडो बलिदान दिली, तुरुंगवास भोगला. तुम्ही काय केलं सांगा ना? तुम्ही फक्त गद्दारांची चळवळ उभी केल्याची टीका राऊत यांनी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *