who Is Sukrut Deo:समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ने रातोरात स्टार झाला मराठमोळा अभिनेता; एका रात्रीत 8 हजार फॉलोअर्सचे झाले लाखो; कोण आहे सुकृत देव?


Sukrut Dev India’s Got Letant: कोमेडीयन समय रैना (Smay Raina) सध्या त्याच्या ‘इंडियाज गॉट लेटंट’ (Indias Got Letant) च्या दुसऱ्या सिझनमुळे चांगलाच चर्चेत आहे. मागील पर्वामुळे त्याला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागलेला. त्यानंतर पुन्हा एकदा समयने काहीसं सावधपणेच दुसऱ्या पर्वाला सुरुवात केली. पण त्याच्या या सिझनमध्ये सर्वाधिक लक्ष वेधलं ते मराठमोळ्या अभिनेत्याने. त्याच्या दारुड्याच्या अभिनयामुळे त्याची प्रचंड चर्चा रंगली. त्याचा परफॉर्मन्स पाहून उपस्थित सगळ्यांनीच त्याला भरभरून दाद दिली. आलिया भट्टचेही डोळे भरून आलेले. सोशल मिडियावर या  व्हिडिओनंतर अक्षरशः या अभिनेत्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. कोण आहे हा अभिनेता? मराठी नाटकात आणि मालिकांमध्ये काम केलेल्या या कलाकाराविषयी जाणून घेऊया.

‘इंडियाज गॉट लेटंट’मधील तो मराठी अभिनेता कोण?

इंडियाज गॉट लेटंटमधील दुसऱ्या सिझनमध्ये सगळ्याचं लक्ष वेधून घेणारा अभिनेता म्हणजे सुकृत देव. या तरुणाने दारुड्या माणसाचा अभिनय केल्याने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं. जागेवर उभारल्यापासून त्याने त्याच्या पात्राचा एवढा प्रभाव सगळ्यांवर पाडला, की सगळ्यांनाच तो खरोखर दारू पिऊन आलाय असं वाटलं. पण नंतर आलिया भट्ट आणि समय रैनाने त्याचा खरा आवाज ऐकायचा असल्याचं संगितल्यानंतर त्याने त्याचा खरा आवाज ऐकवला. त्यानंतर सगळ्यांनीच जागेवरून उठून त्याचं कौतुक केलं. त्यानंतर तो खूप भावनिक झाला होता. त्याच्या अभिनयाचे अनेक व्हिडिओज सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. 

 

अभिनेता सुकृत देव मराठी रंगभूमीवरचा कलाकार आहे.  ‘सुखी आला रे’ असं त्याच्या इन्स्टाग्राम हँडलचं नाव आहे.लेटंटच्या केवळ एका एपिसोडमुळे 8 हजार फॉलोअर्सवरून तब्बल 3. 4 लाख फॉलोअर्स झाले आहेत. एका रात्रीत देशभरात तो ओळखला जाऊ लागला आहे. त्याच्या एका सदरीकरणामुळे प्रेक्षकांमध्ये सुकृतविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे.

सुकृतचं आयुष्य एका रात्रीत बदललं.ऑडिशन्ससाठी रांगेत उभा राहणारा हा तरुण एका 10 मिनिटांच्या भूमिकेमुळे देशभरात ओळखीचा झाला. सुकृत खरंतर मराठी रंगभूमीवरचा कलाकार आहे. काही मालिकांमध्येही त्याने कामं केली आहेत. शाळेपासूनच खरंतर त्याला अभिनयाची गोडी लागली. एकांकिका स्पर्धा, थिएटर सुरु ठेवत तो सोशल मिडीयावर कंटेंट बनवू लागला. कोर्पोरेट मध्ये काही काळ नोकरीही त्याने केली. दिवसभर ऑफिस आणि रात्री शुटींग, लेखन, एडिटिंग असं करत करत तो इथवर पोहोचला आहे. या सगळ्यात त्याला त्याच्या आई बाबांचीही साथ मिळाली. मुंटाला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याची आई नृत्यांगना आणि अभिनेत्री असल्याचं सांगितलं. त्याच्या वडिलांनीही काही मालिकांमध्ये काम केलं असल्याचं सांगितलं.  सध्या  तो पुरुषोत्तम बेर्डे यांच्या ‘मुक्काम पोस्ट आडगाव’ आणि संतोष पवार यांच्या ‘यदाकदाचित रिटन्र्स’ या नाटकांमध्ये तो महत्त्वाची भूमिका साकारत आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *