Raj Babbar Had relation after Smita Patil death;


मुंबई: हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि राजकारणी राज बब्बर यांच्या वैयक्तिक आयुष्याची नेहमीच चर्चा रंगत असते. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यासोबतचं त्यांचं नातं आणि त्यानंतर आलेले चढ-उतार यावर अनेकदा बोललं गेलं आहे. मात्र, आता राज बब्बर यांचा मोठा मुलगा आणि अभिनेता आर्य बब्बर यानं वडिलांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक धक्कादायक आणि मोठा खुलासा केला आहे.

स्मिता पाटील यांच्या निधनानंतर राज बब्बर यांच्या आयुष्यात आणखी एक महिला आली होती आणि त्यांचे आणखी एक प्रेम संबंध होते, असा खुलासा आर्यनं एका मुलाखतीत केला आहे.

Maharashtra TimesArya Babbar: ‘ज्या स्मिता माँसाठी वडिलांनी घर सोडलं, त्यांचाच मुलगा त्यांना स्वीकारत नाहीये’, प्रतिक बब्बरबद्दल स्पष्टच बोलला आर्य बब्बर

वडिलांचे आणखी प्रेमसंबंध होते…

आर्य बब्बरनं आपल्या कुटुंबाच्या काही कटू जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्मिता पाटील यांच्या निधनानंतर राज बब्बर यांच्या मानसिक स्थितीबद्दल आणि त्यांच्या वाढत्या जवळीकतेबद्दल बोलताना आर्य म्हणाला की, कोणत्या मुलाला आपल्या वडिलांच्या प्रेम संबंधांबद्दल ऐकायला आवडेल? पण जे घडलं ते घडलं आणि आता सर्व काही ठीक आहे.

स्मिता यांच्या निधनानंतर बाबा आयुष्यात पुढं गेले होते, आणि त्यांचे आणखी एक रिलेशन होतं.आयुष्यात प्रत्येक गोष्टीचे भावनिक ओझं घेऊन जगू नये, असं विकी ललवाणी यांच्या पॉडकास्टमध्ये तो बोलत होता.

या मुलाखतीत जेव्हा आर्यला राज बब्बर आणि अभिनेत्री रेखा यांच्यातील कथित रिलेशनशीपच्या चर्चांबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्यानं सावधपणे उत्तर दिलं. तो म्हणाला, रेखा एवढ्या सुंदर आहेत की कोण त्यांच्याकडं आकर्षित होणार नाही? बाबांना जर त्यांच्याबद्दल आकर्षण वाटलं असेल, तर त्यात काही वावगं नाही.

Maharashtra TimesAishwarya And Aaradhya: आई तशी लेक! ‘कान्स’च्या इव्हेंटमध्ये ऐश्वर्या रायसह आराध्या बच्चनच्या ग्लॅमरस लुकचीही जोरदार चर्चा

‘ते त्यांच्या ऑफिसमध्येच राहायचे…’

स्मिता पाटील यांच्या अकाली निधनानंतर राज बब्बर पूर्णपणे खचले होते. त्या कठीण काळाबद्दल बोलताना आर्यनं सांगितलं की, स्मिताजींच्या निधनानंतर राज बब्बर लगेचच त्यांच्या पहिल्या कुटुंबाकडं (नादिरा बब्बर यांच्याकडे) परतले नव्हते. त्यांना स्वतःला सावरण्यासाठी वेळेची गरज होती.

बाबांना स्वतःला समजून घेण्यासाठी आणि विचार करण्यासाठी एकांत हवा होता. त्या काळात ते एकटेच राहत असत.आमचं घर तिथून अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर होतं, पण त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्येच राहण्याची व्यवस्था केली होती आणि ते काही वर्षे तिथंच राहिले. दरम्यान, ते आम्हाला भेटायला आणि आमच्यासोबत वेळ घालवायला यायचे, असंही आर्यननं सांगितलं.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *