Cannes 2026: ऐश्वर्या राय बच्चनसोबत कान्समध्ये 14 वर्षांच्या आराध्या बच्चनच्या लुकची चर्चा, लाल भडक गाऊनची एकच चर्चा – aishwarya rai daughter aaradhya bachchan cannes debut in red gown


जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या Cannes Film Festival 2026 मध्ये यंदा केवळ Aishwarya Rai Bachchan चाच नाही, तर तिची मुलगी Aaradhya Bachchan हिचाही जबरदस्त चर्चेचा विषय ठरली. अनेक वर्षांपासून आईसोबत Cannes ला उपस्थित राहणारी आराध्या यंदा पहिल्यांदाच पूर्णपणे ग्लॅमरस आणि कॉन्फिडंट अंदाजात रेड कार्पेटवर दिसली. अवघ्या 14 व्या वर्षी तिच्या स्टायलिश उपस्थितीने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

aaradhya bachchan cannes debut
aaradhya bachchan cannes debut
जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या Cannes Film Festival 2026 मध्ये यंदा केवळ Aishwarya Rai Bachchan चाच नाही, तर तिची मुलगी आराध्या बच्चन हिचाही जबरदस्त चर्चेचा विषय ठरली. अनेक वर्षांपासून आईसोबत Cannes ला उपस्थित राहणारी आराध्या यंदा पहिल्यांदाच पूर्णपणे ग्लॅमरस आणि कॉन्फिडंट अंदाजात रेड कार्पेटवर दिसली. अवघ्या 14 व्या वर्षी तिच्या स्टायलिश उपस्थितीने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

यंदाच्या कान्समध्ये ऐश्वर्याने सफायर ब्लू गाऊनमध्ये आपला रॉयल अंदाज दाखवला, तर आराध्याने लाल भडक गाऊनमध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या या रेड गाऊनमुळे आणि आत्मविश्वासपूर्ण बॉडी लँग्वेजमुळे अनेकांनी तिला “Next Fashion Icon” असेही संबोधले. गाऊनसोबत घेतलेल्या स्टायलिश केपने तिचा संपूर्ण लुक आणखी आकर्षक बनवला. रेड कार्पेटवर चालताना त्या केपचा फ्लो आणि तिच्या चेहऱ्यावरचे आत्मविश्वासपूर्ण स्मित पाहून उपस्थितांची नजर तिच्यावरून हटत नव्हती.

आराध्याच्या या लुकमध्ये साधेपणा आणि एलिगन्सचा सुंदर समतोल पाहायला मिळाला. हलका मेकअप, नैसर्गिक हेअरस्टाईल आणि मिनिमल अॅक्सेसरीजमुळे तिचा संपूर्ण अंदाज अतिशय क्लासी दिसत होता. एवढ्या लहान वयात कॅमेऱ्यासमोर इतक्या सहजपणे वावरण्याची तिची शैली पाहून अनेकांनी तिची तुलना आई ऐश्वर्यासोबत केली. (फोटो सौजन्य :- @fashionbombdaily)

1

1

ऐश्वर्याची मुलगी म्हणून नव्हे, तर स्वतःची वेगळी ओळख

ऐश्वर्याची मुलगी म्हणून नव्हे, तर स्वतःची वेगळी ओळख

गेल्या काही वर्षांत आराध्या अनेकदा ऐश्वर्यासोबत सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसली आहे. मात्र यंदाच्या Cannes मध्ये तिच्या व्यक्तिमत्त्वात मोठा बदल दिसून आला. ती केवळ स्टार किड म्हणून नाही, तर स्वतःच्या स्टाईल आणि कॉन्फिडन्समुळे चर्चेत आली. फॅशन एक्सपर्ट्सच्या मते, आराध्याचा हा लुक तिच्या वयाला साजेसा असूनही खूप क्लासी होता. तिच्या स्टायलिंगमध्ये कोणताही अतिरेक नव्हता. त्यामुळेच तिच्या साधेपणाचे अधिक कौतुक झाले.

आराध्याचा मेकअप

आराध्याचा मेकअप

यंदाच्या Cannes मध्ये अनेक सेलिब्रिटींच्या मुलांनी उपस्थिती लावली, पण भारतीय चाहत्यांसाठी आराध्याच सर्वाधिक चर्चेत राहिली. तिच्या लाल गाऊनमधील फोटोंनी इंटरनेटवर ट्रेंड निर्माण केला.विशेष म्हणजे तिच्या लुकमध्ये कोणताही ओव्हर ग्लॅमर नव्हता. तिच्या वयाला साजेसा निरागसपणा आणि एलिगन्स यामुळे ती इतरांपेक्षा वेगळी वाटली.

कॅन्स फिल्म फेस्टिव्हल 2026

केपने पूर्ण केला लुक

केपने पूर्ण केला लुक

लाल भडक गाऊनसोबत घेतलेल्या स्टायलिश केपने Aaradhya Bachchan चा संपूर्ण लुक आणखी रॉयल आणि आकर्षक बनवला. हलक्या फ्लोईंग फॅब्रिकमधील हा केप रेड कार्पेटवर चालताना अतिशय एलिगंट दिसत होता. गाऊनच्या रंगाशी परफेक्ट मॅच होणाऱ्या या केपमुळे तिच्या लुकमध्ये एक वेगळीच ग्रेस आणि ग्लॅमरस टच पाहायला मिळाला.

चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

भारतीय चाहत्यांसोबतच आंतरराष्ट्रीय मीडियानेही आराध्याच्या लुकची दखल घेतली. काही फॅशन ब्लॉग्सनी “Youngest Style Star at Cannes 2026” असे शीर्षक देत तिच्या फोटोंना विशेष स्थान दिले. एका युजरने सोशल मीडियावर लिहिले, “आराध्याच्या चेहऱ्यावर ऐश्वर्याची झलक स्पष्ट दिसते, पण तिची स्वतःची एक वेगळी ओळखही तयार होत आहे.” तर दुसऱ्याने असे म्हटले आहे.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा