अभिनेत्री पूजा भट्टने वडिल महेश भट्ट यांच्या ‘डॅडी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. अलीकडेच पूजा भट्टने एका मुलाखतीत सांगितलं की, डॅडी फ्लॉप झाल्यानंतर तिने चित्रपटांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला होता. पूजा भट्ट म्हणाली की, वडिलांनी त्यावेळी मला ‘आशिकी’ चित्रपटासाठी विचारलं होतं. पण मीच तो चित्रपट रिजेक्ट केला.