नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ, वणीच्या सप्तशृंगी मातेच्या मंदिराबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

Nashik Saptashrungi Temple Closed: नाशिक जिल्ह्यात पावसाने जोरदार धुमाकूळ घातला असून घाट परिसरात परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

नाशिक सप्तश्रृंगी माता मंदिर
नाशिक सप्तश्रृंगी माता मंदिर

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी, नाशिक : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हवमान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. वणी गडावरीव प्रसिद्ध सप्तश्रृंगी माता मंदिर पुढील तीन दिवस दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर ट्रस्ट आणि प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

अतिवृष्टीचा इशारा, सप्तशृंगी देवीचे दर्शन ३ दिवस बंद

नाशिक जिल्ह्यात पावसाने जोरदार धुमाकूळ घातला असून घाट परिसरात परिस्थिती चिंताजनक बनली आहे. संभाव्य धोका आणि भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन ७, ८ आणि ९ जुलै असे सलग तीन दिवस सप्तशृंगी मातेचे मंदिर दर्शनासाठी पूर्णतः बंद ठेवण्यात आले आहे. या कालावधीत भाविकांना गडावर जाऊन दर्शन घेता येणार नाही.

नांदुरी-सप्तशृंगगड घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद

पावसामुळे गड परिसरात आणि घाटात दुर्घटना घडण्याची शक्यता वाढली आहे: सततच्या पावसामुळे नांदुरी ते सप्तशृंगगड या घाट रस्ता परिसरात दरडी कोसळण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने हा संपूर्ण घाट रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी तातडीने बंद केला आहे.

भाविकांनी गडावर येणे टाळावे, ट्रस्टचे आवाहन

सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट आणि स्थानिक प्रशासनाने सर्व भाविकांना आणि पर्यटकांना नम्र आवाहन केले आहे की, या तीन दिवसांच्या कालावधीत कोणीही गडावर प्रवास करण्याचा प्रयत्न करू नये. तसेच, प्रशासनाकडून वेळोवेळी जारी केल्या जाणाऱ्या अधिकृत सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, जेणेकरून कोणतीही जीवितहानी किंवा अनपेक्षित दुर्घटना टळू शकेल, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *