Petrol Diesel Shortage : इंधन टंचाईची झळ, पेट्रोल पंपावर दिवसरात्र वर्दळ; वाद, हाणामारी अन् गर्दी टाळण्यासाठी पेट्रोल पंप चालकाची अनोखी शक्कल; दरदिवशी 200 कूपन


Maharashtra Petrol Diesel Shortage :  बुलढाणा जिल्ह्यात डिझेल टंचाईने (Fuel Shortage) हाहाकार उडविला आहे. परिणामी अनेक पंपावर ट्रॅक्टर व वाहनाच्या अद्याप रांगा कायम असून पंप चालक, ग्राहक तसेच पंप कर्मचारी यांच्यात वाद, हाणामारीच्या घटना वाढतच आहेत. या सगळ्यांना फाटा देत मेहकर ते चिखली मार्गावरील काठोळे या पंप चालकाने हे वाद, हाणामारी आणि गर्दी टाळण्यासाठी एक नामी शक्कल लढविली आहे. यात डिझेल भरण्यासाठी आलेले ग्राहकाला चक्क कूपन वाटप करणे सुरू केलं आहे. मागील चार पाच दिवसांपासून ही शक्कल लढवल्याने पंपावरील गर्दी कमी झाली. शिवाय वाद, हाणामारी यासारख्या घटनांना सुद्धा आळा बसला. (Petrol Diesel Shortage)

Petrol Diesel Shortage : दरदिवशी 200 कूपन, पंपावर गर्दी कमी अन् वाद, हाणामारी सारख्या घटनांना सुद्धा आळा

दरम्यान, कुपन दाखविल्यावरच ग्राहकांना डिझेल किंवा पेट्रोल मिळतं. शिवाय दरदिवशी 200 कूपन वाटत असल्याने आलेल्या प्रत्येक ग्राहकांना डिझेल मिळत असल्याने त्यांचेही समाधान होत आहे. शिवाय या पंप चालकाचे सर्वत्र कौतुक होत असून याचा आदर्श इतरही लोकांना घ्यावा. असेच काहीसे चित्र आहे.

Dattatray Bharne : राज्यात पेट्रोल डिझेलचा मोठ्या प्रमाणावर साठा, भीती बाळगता गर्दी करू नये

राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा साठा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची घाई गडबड करू नये. ज्यावेळेस पेट्रोल डिझेल लागेल त्यावेळेसच घ्यावे. उगाच साठवणूक करू नये. असे आव्हान राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पंढरपुरातून केले आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच राज्यात धो धो पाऊस पडू दे. हवामान खात्याचे अंदाज चुकीचे ठरून राज्यात समाधानकारक पाऊस पडावा, असे साकडे आपण विठुरायाला घातले असल्याचेही यावेळी भरणे यांनी सांगितले.

Jalgaon: पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलीस अधीक्षकांचे आवाहन

जळगाव शहरात डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर काही पेट्रोल पंपांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि पोलिस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी संयुक्तरित्या विविध पेट्रोल पंपांची पाहणी केली. काही ठिकाणी पोलिस बंदोबस्तात डिझेलचे वितरण सुरू असल्याचेही यावेळी पाहायला मिळाले. यावेळी प्रशासनाने पेट्रोल व डिझेलचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी गोंधळून जाऊ नये, असे आवाहन केले. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने बाटल्या किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल देऊ नये, असे निर्देश पोलिस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी संबंधितांना दिले.

 

Washim: वाशिम जिल्ह्यात सलग दहाव्या दिवशी इंधनाचा तुटवडा

वाशिम जिल्ह्यात सलग दहाव्या दिवशी इंधनाचा तुटवडा असल्याचे चित्र आहे. जिल्हाप्रशासन कडून 7.30 लाख लिटर इंधन साठा उपलब्ध असून साठेबाजी करू नका, अस आवाहन करत असताना डीझल नसल्याने शेतकऱ्यांना वाहनचालकांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे, नंदुरबारच्या शहादा शहरात डिझेल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली आहे.

कॅश पेमेंट नसून ऑनलाईन पेमेंट असल्याच्या रागातनं पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली आहेदरम्यानयातील शेतकऱ्याला मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शहादात इंधन टंचाईमुळे शेतकऱ्यांना इंधन घेण्यासाठी कसरत करावी लागत आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना डिझेल घेण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *