Petrol Diesel Price Hike: ज्याची भीती होती, तेच होतंय…; देशात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले; गेल्या 10 दिवसांत चौथ्यांदा वाढ, पाहा मुंबईसह महत्वाच्या शहरातील नवीन दर


Petrol-Diesel Price Hike: सर्वत्र महागाईचा भडका उडाला असताना त्यात पुन्हा काहीशी भर घालणारी बातमी समोर आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा दरवाढ झाली आहे. गेल्या दहा दिवसांत इंधनाच्या दरात दरवाढ होण्याची ही चौथी वेळ आहे. पेट्रोलच्या दरात 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपयांनी वाढ (Petrol And Diesel Prices Rise) झाली आहे. दिल्लीत डिझेलचा दर 95.20 रुपये प्रति लिटर आणि पेट्रोलचा दर 102.12 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 2.76 रूपये वाढले असून मुंबईत पेट्रो 111.21 रूपये प्रति लीटर, तर डीझेल 2. 81 रूपयांनी वाढून 97.83 रूपये प्रति लीटर इतके झाले आहे. (Petrol And Diesel Prices Rise)

Petrol-Diesel Price Hike: दहा दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ

सर्वात महत्वाची बाब म्हणजे, गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली ही चौथी दरवाढ आहे. पहिली दरवाढ 15 मे रोजी सुमारे ₹3 ने झाली. त्यानंतर 19 मे रोजी सुमारे 90 पैशांनी, पुन्हा 23 मे रोजी सुमारे 90 पैशांनी आणि आता, 25 मे रोजी पुन्हा एकदा लक्षणीय वाढ झाली आहे. एकूणच, गेल्या 10 दिवसांत पेट्रोल प्रति लिटर ₹7.35 ने आणि डिझेल प्रति लिटर ₹7.53 ने महाग झाले आहे.

Petrol-Diesel Price Hike: राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर (25 मे 2026)

मुंबई 

पेट्रोल: नवीन दर 111.12 रुपये/लिटर, जुना 108.39 रुपये/लिटर 
दरवाढ 2.73 रुपये

डिझेल: नवीन दर 97.68 रुपये/लिटर, जुना 94.97 
दरवाढ 2.81रूपये

——————————————

नागपूर मध्ये पेट्रोल 2.72 पैशाने वाढले सध्या पेट्रोल 111.70  रुपये झाले 

तर डिझेल 2.81 पैशानी वाढले डिझेल चे नवीन दर 98.76 रुपये झाले.

——————————————

सोलापूर पेट्रोल/डिझेल दर 
जुने  – 
पेट्रोल – 109.14
डिझेल – 95.74

आज – 
पेट्रोल – 111.87
डिझेल – 98.55

——————————————

कोल्हापूर

पेट्रोल 
काल – 109.36
आज –  111.77

डिझेल
काल –  96.08
आज –  98.46

——————————————

भंडारा : पेट्रोल / डिझेल दर

109.60 (पेट्रोल जुना दर)
112.32 (पेट्रोल नवा दर)

96.18 (डिझेल जुना दर)
98.99 (डिझेल नवा दर)

——————————————

नाशिक पेट्रोल आणि डिझेल आणि दरवाढ

आजपासून नवीन दर

Petrol 112.47
Diesel 99.11

जुने दर
Petrol 109.74
Diesel 96.30

——————————————

वाशिम
पेट्रोल / डिझेल दर

109.83 (पेट्रोल जुना दर)
112.44 (पेट्रोल नवा दर)

95.46 (डिझेल जुना दर)
98.17(डिझेल नवा दर)

——————————————

रायगड

इंधनाचे नवीन दर(प्रतीलीटर) 

पेट्रोल – 112.08 ₹

डिझेल – 98.70 ₹

——————————————

हिंगोली
जुने दर
पेट्रोल 110.29
डिझेल 96.86

नवे दर 
पेट्रोल 113.02
डिझेल 99.67

सांगली:

पेट्रोल नवीन दर 111.69
 (2.73 पेट्रोल वाढ)

डिझेल 98.40 
(2.80 डिझेल वाढ)

गोंदिया : पेट्रोल / डिझेल दर

110.44 (पेट्रोल जुना दर)
113.17 (पेट्रोल नवा दर)

97.02 (डिझेल जुना दर)
99.83 (डिझेल नवा दर)

अमरावती: पेट्रोल / डिझेल दर

सध्याचे दर

पेट्रोल – 112.78
डिझेल – 98.43

आधीचे दर

पेट्रोल – 110.05
डिझेल – 96.63

गोवा

आजचे दर
पेट्रोल: 104.80, 
डिझेल : 96.65,

कालचे दर
पेट्रोल : 102.13, 
डिझेल : 93.91

नंदुरबार 

 पेट्रोल – 109.01 रु.लिटर
आजचे पेट्रोल दर 111.71

डिझेल – 95.52 रु. लिटर
डिझेलचा आजचा दर 98.23

जळगाव

पेट्रोल कालचे दर – 110.45
आजचे पेट्रोल दर- 113.18 
एकूण पेट्रोल मधे 2 रुपये 71 पैसे वाढ

डिझेल कालचे दर – 97.02 
डिझेल आजचे दर- 99.83

बुलढाणा  – पेट्रोल 112.49 ( आजचा )  / 2.72 वाढल 

डिझेल – 99.16 ( आजचा ) / 2.81

चंद्रपूर पेट्रोल डिझेल किंमत

जुने दर 
पेट्रोल – 109.06
डिझेल – 95.68

नवीन दर 
पेट्रोल -111.79
डिझेल – 98.49

धारशिव पेट्रोल/डिझेल दर
जुने – 
पेट्रोल – 109.88
डिझेल -96.45

आज – 
पेट्रोल – 112.61
डिझेल -99.25

पेट्रोल आणि डिझेलसाठी जागतिक स्तरावर तीव्र मागणी (Global Turmoil Over Petrol and Diesel Prices)

लंडनमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 190 च्या वर गेले आहेत. युरोपियन युनियनमध्येही दर प्रति लिटर ₹179 च्या वर गेले आहेत. सध्या जगातील सर्वात महाग पेट्रोल हाँगकाँगमध्ये आहे, जिथे दर प्रति लिटर जवळपास 300 पर्यंत पोहोचले आहेत. नेदरलँड्समध्ये सध्या पेट्रोल 2.90 USD ला विकले जात आहे, जे भारतीय चलनात अंदाजे 245-₹255 प्रति लिटर इतके होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *