Onion Farmers: नाफेड अन् एन.सी.सी.एफ.खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ कायम; 18 खरेदी केंद्रांवर शुकशुकाट; तर भंडाऱ्यात कृषी वीज महिनाभरापासून बंद, शेतकऱ्यांचा निर्वाणीचा इशारा


Onion Farmers: नाफेड आणि एन.सी.सी.एफ.खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ कायम असल्याचे चित्र आहे. किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत आतापर्यंत नाफेड व एन.सी.सी.एफ (NAFED) कडून कांदा खरेदीचे उद्दिष्ट्य 2 लाख मेट्रिक टन होते. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत कांदा खरेदी केवळ 2746.96 मेट्रिक टन इतकेच खरेदी करण्यात आला आहे. तर नाफेड व एन.सी.सी.एफ.चे प्रत्येक 18 खरेदी केंद्र असून देखील कांदा खरेदी अवघी 2746.96 मेट्रिक टन झाली आहे. नाफेड व एन.सी.सी.एफ.ने किमान 3000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून (Onion Farmers) करण्यात आली असून हि मागणी कायम आहे.

तर दुसरीकडे, भंडाऱ्यात कृषी वीज महिनाभरापासून बंद असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. परिणामी बागायती पीक करपली असून भंडाऱ्यात शेतकरी आता आक्रमक झाले आहे. चार दिवसांत वीज द्या, नाहीतर आत्महत्येचा इशारा! शेतकऱ्यांनी दिला आहे.

Nashik Farmer Issue : बाजार समित्यांतील कांदा खरेदीचा फज्जा

केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राने नाफेड व एन.सी.सी.एफ मार्फत कांदा खरेदी सुरू केली. मात्र केंद्राने ठरवून दिलेला भाव हा शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याने व कांदा खरेदी करतांना लावून दिलेल्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील या खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आहे. विशेष म्हणजे महिनाभरात 1250 रुपये प्रति क्विंटल भावापासून ते 1730 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव केंद्राने दिला खरा, पण सद्य स्थितीत नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये 1800 ते 2000 रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने नाफेड खरेदी केंद्रांना अत्यल्प प्रतिसाद मिळत असून शेतकरी खुल्या बाजारात कांदा विक्री करणे पसंत करत आहे. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या 2 लाख मेट्रिक टन उद्दिष्टांपैकी नाशिक जिल्ह्यातील नाफेडच्या खरेदी केंद्रावर आतापर्यंत ( दि.23 जून ) अत्यल्प असा 1083.46 मेट्रिक टन तर एन.सी.सी.एफ च्या खरेदी केंद्रावर 1663.56 मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला आहे.

दरम्यान, केंद्र व राज्य सरकारतर्फे कांदा खरेदी न होण्याची काही कारणमीमांसा शोधणे गरजेचे आहे. पण यात कुठेही ठोस उपाय योजना होतांना दिसत नसल्याने नाफेड व एन.सी.सी.एफ.खरेदी केंद्राचा ‘ फ्लॉप शो ‘ होतांना दिसत आहे. नाफेड व एन.सी.सी.एफ.ने किमान 3000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी कायम केली आहे.

Bhandara: बागायती पीक करपली; भंडाऱ्यात शेतकरी आक्रमक, चार दिवसांत वीज द्या, नाहीतर आत्महत्येचा इशारा!

राज्यात एकीकडं मान्सूनच्या पावसानं जोरदार हजेरी लावलेली असताना भंडाऱ्यात पाहिजे त्या प्रमाणात पावसानं हजेरी लावलेली नाही. राज्य सरकार एकीकडं शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी मोफत वीज देण्याच्या मोठ्या-मोठ्या घोषणा करतंय. पण, दुसरीकडं महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळं शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक डोळ्यांदेखत अक्षरशः करपून गेलंय. भंडारा तालुक्यातून साहुली आणि जुनी पिंपरी गावात महिनाभरापूर्वी आलेल्या वादळात तुटलेल्या वीज तारा आणि पडलेले खांब महावितरणला अजूनही उभे करता आलेलं नाही. परिणामी, कडक उन्हात पाणी नं मिळाल्यानं लाखो रुपयांचा भाजीपाला झाडालाचं करपून काळेकुट्ट झालाय.

महावितरणच्या या मनमानी कारभाराला कंटाळून, “४ दिवसांत वीज दिली नाही तर, आत्महत्या करेन”, असा उद्विग्न इशारा साहुली येथील एका शेतकऱ्यानं दिला आहे. सरकार कागदावर मोफत विजेच्या घोषणा करत असताना, जमिनीवर मात्र महावितरणच्या सुस्त कारभारामुळं बळीराजाचा जीव टांगणीला लागलाय. आता या वैफल्यग्रस्त शेतकऱ्याचा इशारा ऐकल्यानंतर तरी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग येणार का? की एखाद्या शेतकऱ्याचा बळी जाण्याची वाट हे अधिकारी पाहत आहेत? असा संतप्त सवाल आता विचारला जातोय.

Bhandara News : रविवारपर्यंत पोल उभ करण्याचं काम युद्धस्तरावर करू : कनिष्ठ अभियंता

याबाबत महावितरणचे कनिष्ठ अभियंता गजानन देव्हारे यांना विचारणा केली असता त्यांनी. चक्रीवादळात उच्चदाब वाहिनीचे 47 पोल तर लघुदाब वाहिनीचे 91 पोल कोलमडून पडलेत. चार एजन्सीच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे. रविवारपर्यंत पोल उभ करण्याचं काम युद्धस्तरावर करू. असे भंडारा ग्रामीण महावितरणचे कनिष्ठ अभियंता गजानन देव्हारे म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *