या दुखापतीमुळे राम चरणच्या डोळ्याच्या वर तब्बल ८ टाके घालावे लागले होते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, तपासणीनंतर डॉक्टरांनी चिरंजीवींना सांगितले होते की, ही जखम जर अगदी काही मिलीमीटर खाली झाली असती, तर राम चरणला कायमचे अंधत्व आले असते, म्हणजेच त्याच्या एका डोळ्याची दृष्टी गेली असती. सुदैवाने तो घाव भुवईच्या वरच्या बाजूला बसला आणि खूप मोठा अनर्थ टळला.
